CM Pramod Sawant: गोव्यातील विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन पदवी मिळविण्याची संधी; ITI मध्येही नाव नोंदवता येणार

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत पीएम विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षणास सुरवात
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak

CM Pramod Sawant: जे विद्यार्थी पदवी अभ्यासक्रम शिकत आहेत त्यांना दुहेरी पदवी घेण्यासाठी सरकार मान्यता देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. जे पदवी अभ्यासक्रम शिकत आहेत ते औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्येही नावनोंदणी करू शकतात, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत गोव्यात 30,000 लोकांनी आधीच नोंदणी केली आहे. त्याचा लाभ त्यांना मिळेल, असेही ते म्हणाले. राज्यातील पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत कौशल्य प्रशिक्षणाची सुरूवात केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत झाली.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, सरकारी क्षेत्रात 10000 लोक शिकाऊ प्रशिक्षणासाठी नोंदणीकृत आहेत तर 7000 ते 8000 लोक याच योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रात नोंदणीकृत आहेत.

CM Pramod Sawant
Goa Crime News: धक्कादायक! दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेला चक्क परतला घरी; मग ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले तो कुणाचा?

उमेदवाराला एक वर्षाचा अनुभव असावा किंवा त्याने शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे या अनुषंगाने भविष्यात सर्व शासकीय रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जे विद्यार्थी आधीच पदवी अभ्यासक्रम शिकत आहेत, त्यांना दुहेरी पदवीसाठी राज्य सरकार मान्यता देईल.

केंद्रीय मंत्री चंद्रशेखर म्हणाले की, मी गेल्या 30-35 वर्षांपासून देशाच्या तांत्रिक प्रगतीशी निगडीत आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात निर्माण झालेल्या संधींचा विचार करता तुम्ही भारताच्या इतिहासातील सर्वात भाग्यवान पिढी आहात, असे मला म्हणायचे आहे,” मंत्री म्हणाले.

2014 मध्ये आमच्या कर्मचार्‍यांची संख्या 42 कोटी होती. त्यापैकी 31 कोटींकडे कौशल्य नव्हते. कर्मचार्‍यातील चारपैकी तीन जण कौशल्य किंवा शिक्षण नसलेले आहेत.

मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या गेल्या साडेनऊ वर्षात भारत जगातील पाच सर्वोच्च अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे. येत्या काही वर्षांत आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू.

CM Pramod Sawant
Goa Crime: प्लॉटच्या देण्याच्या आमिषाने 3.5 कोटी लुबाडले; आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याला पत्नीसह अटक

मिळणाऱ्या संधींमधून येथील युवक देशाची अर्थव्यवस्था चालवतील. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. हर घर जल, प्रत्येक घरात गॅस सिलिंडर, सर्वांना आरोग्य विमा यासारख्या योजनांच्या धर्तीवर प्रत्येक घरात कौशल्यही असले पाहिजे.

या बदलत्या काळात पदवीपेक्षा कौशल्य अधिक महत्त्वाचे आहे. देशाच्या इतिहासातील हा रोमांचक काळ आहे. अर्थव्यवस्था विस्तारत आहे आणि विविध संधी निर्माण होत आहेत. परंतु या संधींचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कौशल्य असायला हवे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com