CM Pramod Sawant: प्रत्येक विश्वकर्मा लाभार्थ्याला 15 डिसेंबरपुर्वी मिळणार 17500 रूपये; कौशल्य प्रशिक्षण देणार

CM Pramod Sawant: 18 पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना होणार लाभ; ओळखपत्र देणार
CM Pramod Sawant:
CM Pramod Sawant:Dainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत 18 पारंपरिक व्यवसाय करणार्‍यांची गोव्यात ओळख पटवली जाईल. यात फुलांचे हार बनवणारे, बूट दुरूस्ती करणाऱ्यांचाही समावेश असेल. त्यांना केंद्र सरकारतर्फे ओळखपत्रे दिली जातील.

त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल आणि या वर्षी 15 डिसेंबरपर्यंत त्यांच्या प्रत्येक खात्यात 17,500 रुपये हस्तांतरित केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

ते म्हणाले की, केंद्राने या योजनेसाठी राखून ठेवलेल्या 13,000 कोटी रुपयांपैकी किमान 3 ते 4 कोटी रुपये पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना लाभ म्हणून गोव्यात आणले जातील.

संयुक्त कुटुंबात राहणाऱ्या लाभार्थ्यांना राज्यातर्फे स्वतंत्र शिधापत्रिकाही जारी केली जाईल. जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. पंचायत सदस्यांना योजनेंतर्गत लाभार्थी ओळखण्यासाठी प्रशिक्षणात सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे.

CM Pramod Sawant:
Nilesh Cabral: गोव्यातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी पैसेच नाहीत! केंद्र सरकार मदत करेल असे वाटले होते...

मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र सरकारच्या ओळखपत्रांव्यतिरिक्त जे लोक विशिष्ट व्यापाराशी संबंधित आहेत त्यांना कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी विनामूल्य प्रशिक्षण दिले जाईल.

प्रशिक्षण पूर्ण केल्यावर, त्यांना त्यांच्या व्यापाराशी संबंधित टूलकिट खरेदी करण्यासाठी 2500 रुपये दिले जातील. 15 डिसेंबरपर्यंत त्या व्यक्तीच्या खात्यात आणखी 15,000 रुपये जमा केले जातील.

ते म्हणाले की,ज्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा आहे त्यांना या योजनेंतर्गत कोणत्याही सुरक्षा किंवा जामिनाशिवाय 1 लाख रुपयांचे कर्ज 5 टक्के व्याज दराने मिळेल. आयडी कार्ड आणि प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे कर्ज दिले जाईल.

जर ती व्यक्ती 18 महिन्यांनंतर रक्कम परत करू शकली नाही, तर त्या व्यक्तीला आणखी 2 लाख रुपयांचे कर्ज मिळेल, ज्यामध्ये पैसे कशासाठी वापरले गेले याबद्दल कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत.

CM Pramod Sawant:
Vishwajit Rane: गोव्यात आता ट्री हाऊस, रस्टिक टेंट सुद्धा... पर्यटकांसाठी इको टुरिझमचे आकर्षण

हार विक्रेत्या महिलांना योजनेत आणणार

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, जात-धर्माचा विचार न करता पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना याचा लाभ दिला जाईल. अनेक स्त्रिया गोव्यातील चर्च आणि मंदिरांबाहेर विणलेल्या फुलांच्या माळा विकतात.

त्यांना पीएम विश्वकर्मा योजनेत आणायचे आहे. केवळ पंचायत सदस्य किंवा सरपंच ही योजना त्यांच्यापर्यंत नेऊ शकतात.

पहिले काम म्हणजे पारंपरिक व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींची यादी तयार करणे. मदत मिळवण्यात या 18 व्यवसाय करणाऱ्यांपैकी कोणीही मागे राहू नये. पंचायत सदस्यांनी कोणत्याही व्यक्तीला लाभ नाकारू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com