CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

'ईएचएन' क्रमांकांच्‍या घरांना 'वीज, पाणी' जोडणीसाठी तोडगा, महिनाभरात अध्यादेश काढणार; CM प्रमोद सावंतांची माहिती

EHN number house connection ordinance: स्‍वत:च्‍या जमिनीत घरे बांधून ‘ईएचएन’ क्रमांक घेतलेल्‍या घरांना वीज, पाणी जोडण्‍यासंदर्भातील अध्‍यादेश महिन्‍याभरात पंचायत खात्‍याकडून जारी केला जाईल, अशी हमी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
Published on

पणजी: स्‍वत:च्‍या जमिनीत घरे बांधून ‘ईएचएन’ क्रमांक घेतलेल्‍या घरांना वीज, पाणी जोडण्‍यासंदर्भातील अध्‍यादेश महिन्‍याभरात पंचायत खात्‍याकडून जारी केला जाईल, अशी हमी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभा सभागृहात बोलताना दिली. आमदार गोविंद गावडे यांनी शून्‍य प्रहराला याबाबतचा प्रश्‍‍न उपस्‍थित केला होता.

राज्‍यातील अनेक नागरिकांनी स्‍वत:च्‍या जमिनीत घरे बांधून पंचायत खात्‍याकडून ‘ईएचएन’ क्रमांकही मिळवलेला आहे. तरीही वीज आणि सार्वजनिक बांधकाम खात्‍याकडून (पीडब्‍ल्‍यूडी) अशा घरांना वीज आणि पाणी जोडण्‍या दिल्‍या जात नाहीत. त्‍याचा फटका राज्‍यातील हजारो नागरिकांना बसत आहे.

CM Pramod Sawant
Goa Restaurants Sealed: चार विनापरवाना रेस्टॉरंटना टाळे, जिल्हा प्रशासनाची कारवाई; हरमलात एका आस्थापनावर बडगा

त्‍यामुळे सरकारने हा विषय गांभीर्याने घेत यावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी गावडे यांनी केली. त्‍यावर बोलताना, ‘ईएचएन’ क्रमांक घेतलेल्‍या घरांना वीज आणि पाण्‍याच्‍या जोडण्‍या देण्‍यास उच्च न्‍यायालयाने बंदी घातलेली आहे.

CM Pramod Sawant
Goa News: पाणीपुरवठ्यावर आता 'स्मार्ट' नजर! गळती रोखण्यासाठी रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टीम; मंत्री फळदेसाई यांची माहिती

त्‍यासंदर्भात कायदेशीर मार्गही शोधत आहे. जनतेचे प्रश्‍‍न सोडवण्‍यासाठी वीज, पीडब्‍ल्‍यूडीसह पंचायत खातेही महत्त्‍वाचे आहे. त्‍यामुळे अशा घरांना पाणी जोडणी देण्‍यास अध्‍यादेश जारी करू, असे मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com