CM Pramod Sawant : ड्रग्जमुक्तीसाठी कठोर कारवाई; गोवा पोलिसांना निर्देश

CM Pramod Sawant : गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने देशी-विदेशी पर्यटक दरवर्षी मोठ्या प्रमाणात येत असतात.
Goa Government | Pramod Sawant
Goa Government | Pramod SawantDainik Gomantak news
Published on
Updated on

पणजी : गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने देशी-विदेशी पर्यटक दरवर्षी मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे ड्रग्ज विक्रीप्रकरणी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.

Goa Government | Pramod Sawant
Goa Mid-Day Meal : दिवाळी सुट्टीनंतर माध्यान्ह आहार पुरवठा करणार बंद! स्वयंसेवी गटांचा इशारा

अमलीपदार्थविरोधी कक्ष अधिक सक्षम करण्यासाठी मनुष्यबळात वाढ करण्याचा सरकारचा विचार आहे. ड्रग्ज प्रकरणात गुंतलेल्या व बेकायदेशीरपणे वास्तव्य करून गोव्यात राहणाऱ्या विदेशी नागरिकांचा शोध सुरू आहे. गेल्या तीन वर्षात 700 पैकी 650 नायजेरियन बेकायदेशीर वास्तव्य करून होते. त्यांची पाठवणी करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील पश्‍चिम विभागीय राज्यांच्या गृहमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक संध्या. 5 वा. आयोजित केली होती. गोव्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री सावंत यांनी आज पोलिस मुख्यालयात या बैठकीत भाग घेतला. ड्रग्ज तस्करी व राष्ट्रीय सुरक्षा हा या बैठकीचा मुख्य विषय होता. यावेळी त्यांच्यासमवेत पोलिस महासंचालक जसपाल सिंग, उपमहानिरीक्षक अस्लम खान तसेच अमलीपदार्थविरोधी कक्षाचे अधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com