

पणजी: इयत्ता १२ वी नंतर नेमके काय करावे? या संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी गोवा सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ‘करियर उड्डाण’ या विशेष उपक्रमाचा आणि त्याशी संबंधित क्युआर कोड असलेल्या फ्लायरचे अधिकृत अनावरण करण्यात आले.
या क्युआरच्या अनावरणप्रसंगी उद्घाटन सोहळ्याला शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, उच्च शिक्षण संचालक भूषण सवाईकर, शिक्षण संचालक शैलेंद्र झिंगडे, जीएसईआरटीच्या संचालिका मेघना शेटगावकर आणि डॉ. महादेव गावस उपस्थित होते. हा उपक्रम प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा, महाविद्यालये, पंचायती आणि नगरपालिकांमध्ये या फ्लायर्सचे वाटप करण्यात आले आहे.
माहितीचा अभाव कोणाच्याही प्रगतीत अडथळा ठरू नये, यासाठी आम्ही करिअर विषयक माहितीचे सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. जर विद्यार्थ्यांना योग्य माहिती मिळाल्यास ते योग्य करिअरच्या दिशेने पाऊल टाकतील. गोव्याच्या तरूणाईच्या भवितव्याच्या अनुषंगाने हे महत्त्वाचे पाऊल आहे. या उपक्रमाचा विद्यार्थी आणि पालकांना लाभ घेत योग्य करिअर निवडावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
डिजिटल पुस्तिका!
या एका क्यूआर कोडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘करियर कंपास’ नावाची सर्वसमावेशक डिजिटल माहितीपुस्तिका मोफत उपलब्ध होणार आहे. गोवा राज्य उच्च शिक्षण परिषदेने तयार केलेली ही पुस्तिका १२ वी नंतरच्या विविध करिअर वाटा, स्पर्धा परीक्षा आणि देश-परदेशातील शिष्यवृत्ती पर्यायांचे सविस्तर मार्गदर्शन करते. या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचे स्वरूप. ‘करियर उड्डाण’ फ्लायरवरील क्युआर कोड स्कॅन करताच ही डिजिटल पुस्तिका डाऊनलोड होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.