Valpoi News : गावचा विकास हा गोव्याचा विकास : मुख्यमंत्री सावंत

होंडा पंचायतीच्या नव्या इमारतीचे थाटात लोकार्पण
Cm Pramod Sawant inaugurated various infrastructure development projects in Valpoi
Cm Pramod Sawant inaugurated various infrastructure development projects in ValpoiDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यातील प्रत्येक भागात साधन सुविधायुक्त पंचायत कार्यालये उभी राहावीत यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. होंडा येथे तीन कोटी खर्च करून उभारलेल्या पंचायत कार्यालयाच्या सुसज्ज इमारतीचे आज लोकार्पण करताना अत्यंत आनंद होत आहे. प्रत्येक गावचा विकास हाच गोव्याचा विकास आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते नाम फलकाचे अनावरण तसेच फीत कापून नव्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पर्ये आमदार डॉ. दिव्या राणे, सरपंच शिवदास माडकर, साधन सुविधा महामंडळाचे हरीश तसेच इतर पंच सदस्यांची उपस्थिती होती.

Cm Pramod Sawant inaugurated various infrastructure development projects in Valpoi
Goa Beach Shacks : शॅक्स उभारण्यास परवानगी द्या; केरीवासीयांची मागणी

मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले की, पंचायत क्षेत्राच्या विकासात पंच सभासदांचा मोलाचा वाटा असतो. स्वयंपूर्ण मित्रांव्दारे सरकारच्या प्रत्येक योजना गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे सरकारचे लक्ष आहे.

आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत, असे पुढे म्हणाले. सरपंच शिवदास माडकर यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने पंचायत क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

सौंदर्यीकरण प्रकल्पाचे काम लवकरच : विश्‍वजीत

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले की, होंडा पंचायत इमारतीची पायाभरणी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी केली होती. त्यांनी सत्तरीचा विकासाला दिशा दिली, तो वारसा पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आमदार दिव्या राणे यांच्यामुळे पर्ये मतदारसंघाच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. होंडाच्या विकासासाठी अन्य काही प्रकल्पही लवकरच राबवण्यात येतील. शहर सौंदर्यीकरणचे काम लवकर हाती घेतले जाईल, असे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी यावेळी सांगितले.

Cm Pramod Sawant inaugurated various infrastructure development projects in Valpoi
Viral Video: 'प्रमोद सावंत गुजरातचे मुख्यमंत्री', मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री जाहीर भाषणात चुकले अन्...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com