Goa Literacy Campaign 2024: येत्या मुक्तीदिनापूर्वी गोव्याला साक्षरतेत स्वयंपूर्ण करण्याचं ध्येय; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला मानस!

Literacy Mission in Goa 2024: येत्या मुक्तिदिनापूर्वी गोवा साक्षरतेत स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून यासंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वतः आढावा घेत आहेत.
CM Pramod Sawant on Pension Scheme सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर वेतनाच्या 50 टक्के पेन्शन मिळणार
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: गोव्याला १९ डिसेंबरपर्यंत १०० टक्के साक्षर राज्य घोषित करण्याचे लक्ष्य राज्य सरकारने ठेवले आहे. येत्या मुक्तिदिनापूर्वी गोवा साक्षरतेत स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून यासंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वतः आढावा घेत आहेत.

राज्यातील आतापर्यंत सुमारे ३ हजार अक्षर ओळख नसलेल्या (निरक्षर) नागरिकांची शैक्षणिक संस्थांच्या मदतीने ओळख पटविण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे नवीन साक्षरता कार्यक्रमानुसार १५ वर्षांवरील ज्या व्यक्तीला अक्षर ओळख नाही, अशा व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर त्यांना चाचणी देत साक्षर घोषित करण्यात येते. या मोहिमेत पंचायत संचालनालय, नगरपालिका प्रशासन संचालनालय, समाज कल्याण संचालनालय, नियोजन आणि सांख्यिकी संचालनालयाचा समावेश आहे.

CM Pramod Sawant on Pension Scheme सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर वेतनाच्या 50 टक्के पेन्शन मिळणार
Goa Government Schools: गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

ज्या नागरिकांना अक्षर ओळख नाही त्यांना प्रशिक्षण घेण्याचे आवाहन राज्य प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राद्वारे केले आहे. प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांनी आपल्या पंचायत तसेच नगरपालिका कार्यालयात कळवावे. त्यानंतर प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षक पाठविण्यात येतील.

मेघना शेटगावकर, संचालक ‘एससीआरटी’

राज्यातील नागरिक ज्यांना अक्षर ओळख नाही, त्यांना साक्षर करण्यासाठी सर्व खात्यांद्वारे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील ३५ पंचायतींनी तसेच काही नगरपालिकांनी सुमारे १ हजारांहून अधिक अक्षर ओळख नसलेल्या नागरिकांची ओळख केली आहे. त्यासोबतच, अजूनही काही नागरिकांची ओळख पटविण्यात येत आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन येत्या काळात चाचणी घेऊन त्यांना साक्षर घोषित करण्यात येणार आहे.

गोवा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com