Pernem Crime News: न्हयबाग-पोरस्कडे येथे अवयवांचे तुकडे केलेल्या स्थितीत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पेडणे पोलिसांनी सिंधुदुर्ग व कणकवली भागात जाऊन तपास केला.
मात्र, त्यातून काहीच ठोस धागेदोरे सापडले नाहीत. कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा चेहराच नसल्याने ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत.
मृतदेहाचे तुकडे केल्याने संशयित चलाख असून पुरावे मागे न ठेवण्याचा प्रयत्न त्याने केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
या खुनाचा शोध घेण्याचे आव्हान पेडणे पोलिसांसमोर असल्याने घटनेच्या दिवसापासून गोव्यासह महाराष्ट्रातील पोलिस स्थानकांना त्यांच्या भागातील बेपत्ता असलेल्या व्यक्तींच्या माहितीची पडताळणी करण्यास सांगितले आहे.
संशयिताने शरीरावरील कपडे काढून मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळे फेकले होते. शवचिकित्सा अहवालात या शरीराचे तुकडे एकाच मृतदेहाचे असल्याचे सिद्ध झाले असले तरी चेहऱ्याचा भाग तसेच एक पाय अजूनही गायब आहेत. हे तुकडे संशयिताने इतर ठिकाणी फेकून दिले असावेत.
सायबर कक्षाचीही मदत
या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी वेगवेगळी पोलिस पथके तयार केली असून प्रत्येक पथकाला वेगवेगळी कामे सोपवली आहेत. ज्या ठिकाणी मृतदेहाचे अवयव सापडले, तेथील मोबाईल टॉवरची मदत घेऊन कोणकोणते क्रमांक ॲक्टिव्ह होते याचा शोध घेण्यासाठी सायबर कक्षाचीही मदत घेतली जात आहे. सध्या सापडलेल्या मृतदेहाच्या अवयवांचे तुकडे गोमेकॉच्या शवागारात ठेवले आहेत.
अनैतिक संबंधाची किनार
या महिलेचा खून अनैतिक संबंधातून झाला असण्याची शक्यता आहे. हा खून उघडकीस येऊ नये यासाठी मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने अवयवांवर एकही खूण सापडलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.