CM Pramod Sawant: गोव्याला आता जगाची पर्यटन राजधानी बनवूया

'''No to Drugs मध्ये सहभागी होत गोवा पर्यटनासाठी सुरक्षित असल्याचं जगाला दाखवूया''
Cm Pramod Sawant
Cm Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

'No to Drugs' राज्यात गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थ तस्करी अन् बेकायदा विक्रीची प्रकरणे वारंवार समोर येत आहेत. याची गंभीर दखल घेत गोवा सरकारने आता ''No to Drugs' मोहिम हाती घेतली आहे.

(CM pramod Sawant Appeal active participation of youngsters in 'No to Drugs' drives in goa)

Cm Pramod Sawant
Goa Accident: करमल घाटात अपघातांची मालिका सुरुच, रस्ता रुंदीकरणाची आवश्‍यकता!

या मोहिद्वारे गोवा सरकार 365 दिवसांत अमली पदार्थमुक्तीसाठी प्रयत्नशिल असणार आहे. त्यामूळे 'No to Drugs' मोहिमेत गोव्यातील तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज केले.

Cm Pramod Sawant
Goa AAP: हिंमत असेल तर शपथपत्र मोडलेल्या आमदारांवर एफआयआर दाखल करा

मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले की, "अँटी नार्कोटिक्स सेल आणि गोवा पोलिस यावर काम करत आहेत. त्यामूळे या मोहिमेला आणखी गती प्राप्त होणार आहे. याचबरोबर तरूण युवकांनी ही यात सहभागी होणे आवश्यक आहे. कारण गोवा हा जगभरातील प्रत्येकाच्या पर्यटनासाठी सुरक्षित ठिकाण असल्याचा संदेश यातून जाणार आहे. आपण सर्वजण सहभगी होत गोव्याच्या विकासाभिमूख बदलात सहभागी होऊयात असे ही ते यावेळी म्हणाले.

आपण आता अधिक सक्रिय होवूया कारण गोव्याला जगाची पर्यटन राजधानी बनवायची आहे, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'क्लीन कोस्ट, सेफ सी' कार्यक्रमात ते बोलत होते.

गोव्यातील 37 समुद्रकिनाऱ्यांवर या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. “गोवावासीयांनी पर्यटन आणि ब्ल्यू इकोनॉमीसाठी 104 किमीचा किनारा वापरला आहे. हे समुद्रकिनारे आणि ब्लू इकॉनॉमीचे फायदे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवेत,” ते पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com