Purple Fest 2024: गोव्यात 'पर्पल फेस्त'चे आयोजन; मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोव्यात सहा दिवसीय महोत्सवाचे 8 ते 13 जानेवारीपर्यंत आयोजन होणार आहे.
Purple Fest
Purple FestDainik Gomantak

गोवा सरकारने सोमवारी इंटरनॅशनल पर्पल फेस्ट 2024ची घोषणा केली. 8 ते 13 जानेवारी या कालावधीत पर्पल फेस्ट 2024चे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

कार्यक्रमाला  यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, सचिव सुभाष चंद्रा,  राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर व सचिव ताहा हाजिक उपस्थित होते.

दिव्यांग कल्याण आयुक्त, गोवा राज्य समाजकल्याण संचालनालय आणि गोवा मनोरंजन संस्थेच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

Purple Fest
Valpoi Municipal Council: वाळपई नगराध्यक्षपदी प्रसन्ना गावस यांची बिनविरोध निवड

मुख्यमंत्री म्हणाले, पर्पल फेस्ट जागतिक स्तरावरील दिव्यांग लोकांसाठी एक आशेचा किरण आणि महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. गेल्या वर्षी पर्पल फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान मोदींनी मन की बात या कार्यक्रमातून पर्पल फेस्टचे कौतुक केले. 

त्यामुळे यंदा सरकारने हा फेस्टिवल आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्याचे ठरवले आहे. जगभरातील दिव्यांगांनी तसेच त्यांच्यासाठी काम करणाऱ्या एनजीओंनी या संधीचा फायदा घ्यावा असे मुख्यमंत्री म्हणाले.

फळदेसाई म्हणाले, पर्पल फेस्ट २०२४ हा केवळ उत्सव नसून तो एकता, समानता आणि समजूतदारपणा आणण्यासाठीचे एक माध्यम आहे. प्रत्येक व्यक्तीमधील अद्वितीय सामर्थ्य आणि कलागुण असतात.

आम्ही पर्पल फेस्ट द्वारे हेच गुण साजरी करण्याची संधी देणार आहोत. हा खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक समाज आहे असा आमचा विश्वास आहे.

Purple Fest
Pernem News : छत्रपती शिवाजी महाराजांंचे विचार आदर्शवत प्रवीण आर्लेकर ; धारगळ येथे अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com