CM Dev Darshan Yatra: 'मुख्यमंत्री देवदर्शन यात्रे'साठी दहा कोटी रुपयांची तरतूद! मंत्री फळदेसाई यांची माहिती

CM Dev Darshan Yatra Scheme: मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेअंतर्गत यंदा पहिली यात्रा शुक्रवार, ९ रोजी मडगाव रेल्वे स्थानकावरून वालंकिणीला रवाना झाली.
CM Dev Darshan Yatra
CM Dev Darshan YatraDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेअंतर्गत यंदा पहिली यात्रा शुक्रवार, ९ रोजी मडगाव रेल्वे स्थानकावरून वालंकिणीला रवाना झाली. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. या यात्रेत १२०० भाविक सहभागी झाले आहेत. यंदाच्या देवदर्शन यात्रा योजनेसाठी सरकारने १० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मंत्री फळदेसाई यांनी पत्रकारांना सांगितले.

यातून मागील वर्षांची दोन कोटी बाकी बिले दिली आहेत, त्यामुळे या वर्षासाठी ८ कोटी रुपये यात्रेसाठी खर्च करण्यासाठी बाकी असल्याचे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले. यंदाची ही पहिलीच यात्रा असल्याने यावेळी अनेक कारणांमुळे भाविकांचा कमी प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

CM Dev Darshan Yatra
Goa Crime: टॉवेल आणण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार; 75 वर्षीय गुन्हेगाराला सश्रम कारावासाची शिक्षा

या यात्रेत भाविकांची सर्व देखरेख योग्यप्रकारे केली जाईल, त्यांना मोफत नाश्ता, दुपारी व रात्रीचे जेवण दिले जाईल. त्यांच्यासाठी वैद्यकीय सुविधा प्रवासादरम्यान उपलब्ध केल्या आहेत. हे यात्रेकरू ११ रोजी सकाळी ११ वा. परत गोव्यात पोहोचतील, असे फळदेसाई यांनी सांगितले.

CM Dev Darshan Yatra
Goa Drug Case: कपड्यांखाली लपवले होते 3 कोटींचे ड्रग्स! मोपा विमानतळावरून विदेशी पर्यटकाला अटक

दुसरी यात्रा अयोध्या येथे होणार आहे. ही यात्रा १९ जानेवारीला सुरू होईल व त्यासाठी अनेकांकडून मागणी येत आहे. आमदारही विचारपूस करीत आहेत. अयोध्येसाठी तीन जादा कोचची मागणी करण्यात आल्याचे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com