NCP Goa: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गोव्यात बूस्ट मिळणार का? युवा नेतृत्वाच्या खांद्यावर कमान

पक्षाची पुनर्रचना प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पूर्ण करणार असल्याचे क्रॅस्टो यांनी म्हटले आहे.
NCP Goa | Sharad Pawar
NCP Goa | Sharad Pawar Dainik Gomantak
Published on
Updated on

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गोव्यात (Goa NCP) मागील दोन दिवसांपासून बैठकींचा धडाका लावला आहे. गोवा राष्ट्रवादीचे निरीक्षक आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाइड क्रॅस्टो (Clyde Crasto) तीन दिवसीय गोवा दौऱ्यावर आहेत. पक्षाची पुनर्रचना प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पूर्ण करणार असल्याचे क्रॅस्टो यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी दोन नव्या नियुक्ती देखील केल्या.

क्लाइड क्रॅस्टो यांनी यावेळी कार्मोणाच्या सरपंच सँड्रा मार्टिन्स फर्नांडिस (Sandra Martins Fernandes) यांची राज्य महिला अध्यक्षपदी नियुक्ती केली, तर कोलवा जिल्हा पंचायत सदस्य वानिया बाप्टिस्टा (Vania Baptista) यांची राज्य युवा संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.

पक्षात तरुणांना संधी देण्यावर भर देण्यात आला आहे. "पक्षाच्या पुनर्रचनेचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पूर्ण करणार आहे. पुनर्रचनेचा भाग म्हणून आम्ही शून्यापासून सुरुवात करत, राज्यात राष्ट्रवादी बळकट करण्यावर भर देत आहोत." असे क्रॅस्टो म्हणाले. पक्ष राज्यातील स्थानिक मुद्यांवर आवाज उठवण्याचे काम करेल असेही क्रॅस्टो यांनी नमूद केले.

NCP Goa | Sharad Pawar
Illegal Construction: ‘एनडीझेड’मधील बांधकामांवर कारवाई करा

गोव्यात सध्या विविध स्थानिक मुद्दे गाजत आहेत. यात म्हादई नदीचा (Mahadayi Water Dispute) मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे. केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्या मंजूर केलेल्या सुधारीत डिपीआरवरून 'राज्यातील भाजप सरकारने म्हादई कर्नाटकला विकली', असा थेट आरोप विरोधक करत आहेत. दरम्यान, म्हादईबाबत ठोस भुमिका घेताना गोवा राष्ट्रवादी दिसली नाही. तसेच, राज्यातील कळीच्या मुद्यांवर पक्ष स्पष्ट भुमिका घेताना दिसून येत नाही.

NCP Goa | Sharad Pawar
Margao News: मडगावात ‘पार्किंग’वर ‘रेंट अ बाईक’चा कब्जा

राष्ट्रवादीला गोव्यात बूस्ट मिळणार का?

गोव्यात सध्या भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. त्यात काँग्रेसच्या आठ आमदारांनी बंडखोरी करत भाजपमध्ये जाणं पसंद केले. त्यामुळे राज्यात भाजप अजून स्ट्राँग झालीय तर, काँग्रेसची वाताहत झाली आहे. याशिवाय राज्यात निवडणूकीत सर्वाधिक खर्च करणाऱ्या तृणमूलचा येथे सध्या एकही आमदार नाही. केजरीवाल यांच्या आपची देखील तीच अवस्था असली तरी पक्षाचे दोन आमदार वारंवार चर्चेत असतात.

महाराष्ट्रातील शिवसेना फुटीचा गोव्यात फारसा प्रभाव दिसून आला नाही. दरम्यान, राष्ट्रवादीत युवा नियुक्तीवर भद दिला जात आहे. युवा राज्यात पक्षाला नवी उर्जा देणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com