Margao News: मडगावात ‘पार्किंग’वर ‘रेंट अ बाईक’चा कब्जा

नगरसेवकाचा आरोप ः संबंधितांवर कारवाईची मागणी
Margao News
Margao NewsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव नगरपालिका परिसरातील सर्व ठिकाणच्या पार्किंग जागांवर ‘रेंट ए बाईक’वाल्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्यांना आपल्या दुचाकी पार्क करण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे या ‘रेंट अ बाईक’ वाल्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मडगाव नगरपालिकेचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी केली आहे.

विशेष म्हणजे खाजगी दुचाकीही या ‘रेंट अ बाईक’वाल्यानी ‘रेंट’साठी वापरल्या आहेत. त्यांचेही पार्किंग या परिसरात करण्यात येत असल्याचे आमोणकर यांनी सांगितले. या ठिकाणी रात्रीच्या वेळी आपल्या रेंट बाईक पार्क करून जागा अडवून ठेवत आहेत.

हे पाहण्यासाठी आमोणकर रात्री 10.30 वाजता आले होते. नगरपालिका पार्किंग परिसर, मार्केट पार्किंग परिसर अशा सर्वच ठिकाणी आपल्या दुचाकी पार्क करून ठेवत आहेत. सकाळी या दुचाकी भाड्याला गेल्या तर गेल्या, नाहीतर सकाळपर्यँत याच ठिकाणी पडून राहतात.

त्यामुळे मडगाव बाजारात बाजार करण्यासाठी दाखल होणाऱ्यांना आपल्या दुचाकी पार्क करण्यासाठी जागा मिळत नाही. येथील दुकादारावरही याचा परिणाम होत आहे. हा प्रश्न निकालात काढण्यासाठी आमदार दिगंबर कामत यांना विनवणी करून त्यांच्या कानावरही ही बाब घातली आहे, असे ते म्हणाले.

दादागिरीची भाषा!

कधी कधी हे रेंट बाईकवाले येथील भाडे मारणाऱ्या मोटरसायकल पायलट वाल्यांची जागा हडप करून आपल्या दुचाकी पार्क करीत आहेत आणि विचारल्यास त्यांच्याकडे दादागिरीची भाषा बोलत असल्याचे आमोणकर यांनी सांगितले. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही आमोणकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Benjamin Netanyahu Election
Harmanpreet Kaur Captaincy
Key Demands to 8th Pay Commission
Margao Municipal Land Dispute
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com