गोवा, पुणे, श्रीनगर विमानतळांवरील आंतरराष्ट्रीय उड्डाणे डिसेंबरनंतर होणार बंद?

विमान वाहतूक नियामक आणि हवाई वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Air Transport) संरक्षण मंत्रालयाला (Ministry of Defense) लिहिलेल्या पत्राक डीजीसीला (DGCA) या विमानताळांचा परवाना देण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे या शहरांमधून आंतरराष्ट्रीय उड्डाणे (International flights) थांबू शकतात.
लष्करी मालकीची असलेल्या विमानतळावरुन डिसेंबरनंतर (December) आंतरराष्ट्रीय उड्डणे (International flights) थांबण्याची शक्यता आहे.
लष्करी मालकीची असलेल्या विमानतळावरुन डिसेंबरनंतर (December) आंतरराष्ट्रीय उड्डणे (International flights) थांबण्याची शक्यता आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

लष्करी मालकीची असलेल्या विमानतळावरुन डिसेंबरनंतर (December) आंतरराष्ट्रीय उड्डणे (International flights) थांबण्याची शक्यता आहे. यात पुणे (Pune), गोवा (Goa) आणि श्रीनगर (Srinagar) या विमानतळांचा (Airport) समावेश असेल. जागतिक नियमांनुसार या विमानतळांना आंतरराष्ट्रीय उड्डाणे महासंचालनाने परवाना देणे आवश्यक असते. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, एका अहवालात नेडाचा उल्लेख करण्यात आला आहे.

या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, विमान वाहतूक नियामक आणि हवाई वाहतूक मंत्रालयाने संरक्षण मंत्रालयाला लिहिलेल्या पत्राक डीजीसीला (DGCA) या विमानताळांचा परवाना देण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे या शहरांमधून आंतरराष्ट्रीय उड्डाणे थांबू शकतात. नागरी उड्डाण नियामकाने या विमानतळांना परवाना मिळवण्याच्या हालचालींना लष्कराने नेहमीच विरोध केला आहे. कारण सामान्य नागरीकांना लष्कराच्या संवेदनशील ठिकाणांवर परवानगी देण्यात येत नाही.

या आम्ही एक पर्याय काढला असून, जिथे लष्कराची टीम त्या भागांना भेट देईल जेथून नागरी उड्डाणे होतात. असे एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. या तीन प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी पुणे आणि श्रीनगर ही विमानतळे भारतीय हवाई दलाच्या मालकीचे आहेत. तर गोवा हे भारतीय नौदलाच्या मालकीचे आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, 2018 मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत संबंधित देशाच्या नियामकाने परवाना नसलेल्या विमानतळांना आणि तेथून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला होता. या विमानतळांना परवाना देण्याची अंतिम मुदत डिसेंबर 2020 होती. परंतु कोविड महामारीमुळे ती पुढे एक वर्षे म्हणजेच डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली. ती आणखी वाढवली जाऊ शकते परंतु या विमानतळांना परवाना देणे आवश्यक आहे," असे एका अन्य वरिष्ठ अधिकाऱ्याने ईटीला सांगितले. ईटीने डीजीसीएचे महासंचालक अरुण कुमार यांना पाठवलेल्या प्रश्नांना अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com