Nightclub In Goa: लोकांच्या तोंडाला पाने पुसली का? ‘सील’ केलेले क्लब सुरू असल्याची धक्कादायक माहिती; कारवाईच्या फार्समुळे संताप

Goa NightClub News: मध्यंतरी, अग्निशमन दल संचालकांनी आम्ही कुणालाच ‘एनओसी’ दिल्या नाहीत, असे ‘ऑन रेकॉर्ड’ नमूद केले होते.
Baga Hadfade Night Club
Baga Hadfade Night Club Canva
Published on
Updated on

म्हापसा: हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन क्लबमधील भीषण अग्नितांडवानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. सरकारने नियुक्त केलेल्या अंमलबजावणी पथकाकडून, किनारी भागांतील क्लबच्या तपासणीचा सपाटा लावला.

परिणामी, डिसेंबरच्या मध्यात अनिवार्य सुरक्षा नियमांचे पालन न केल्याबद्दल तब्बल सहा क्लब सील करण्यात आले. परंतु, हे क्लब ३१ डिसेंबरपासून पुन्हा नव्या दमाने सुरू झाल्याची माहिती मिळत आहे.

सरकार नियुक्त संयुक्त अंमलबजावणी व देखरेख समितीला तपासणीवेळी सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्यानंतर, सालुद, मायान बीच क्लब, डियाझ, कॅफे सीओ-२, गोया, क्लारा हे क्लब सील केले होते. मात्र, थर्टी फर्स्टला यातील चार क्लबचे सील हटविण्यात आले. याठिकाणी ‘न्यू इअर’च्या पार्ट्या वाजल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या हे क्लब सुरू आहेत.

Baga Hadfade Night Club
Arpora Nightclub Fire: "सरपंचाला का बनवताय बळीचा बकरा?" बिर्च बाय रोमिओ दुर्घटनेबाबत सरदेसाईंचा रोखठोक सवाल; विधानसभेत उठवणार आवाज

यासंदर्भात, अग्निशमन दलाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, अधिकारी फोन उचलत नव्हते. मध्यंतरी, अग्निशमन दल संचालकांनी आम्ही कुणालाच ‘एनओसी’ दिल्या नाहीत, असे ‘ऑन रेकॉर्ड’ नमूद केले होते. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, ज्या क्लबने ‘फायर-सेफ्टी एनओसी’ दिल्या, ते उघडल्याचे नमूद केले.

Baga Hadfade Night Club
Goa Nightclub Fire: 'लुथरा बंधूंना फाशी द्या', बर्च अग्निकांडप्रश्‍नी दिल्लीत निदर्शने; पीडितांच्या नातेवाईकांची जंतरमंतर येथे न्यायाची मागणी

त्यामुळे खाते व अधिकाऱ्यांच्या एकंदर तोंडी माहितीमुळे एकप्रकारे संभ्रम निर्माण झाला आहे. बर्च दुर्घटनेनंतर, प्रशासकीय यंत्रणा तसेच सरकार खरोखर या अनधिकृत गोष्टींविषयी गंभीर असल्याचे दिसले. परंतु, पुन्हा एकदा संबंधित क्लबचे सील उघडल्याने, हा प्रकार लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा होता का?, असा सवाल उपस्थित होतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com