हवामान बदलामुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे गोव्याची किनारपट्टी 20 टक्के खचली

मानवी हस्तक्षेपाचाही विपरीत परिणाम; उपाययोजनेची मागणी
Sea Shore
Sea Shore Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: समुद्र तटावर असल्याने पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गोव्यासाठी एक धक्कादायक खबर! हवामान बदल आणि वाढता मानवी हस्तक्षेप यामुळे गोव्यातील 20 टक्के किनारपट्टी खचून गेली आहे. त्यामुळे त्याचा पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. (Climate change and human intervention have eroded Goa's coastline by 20 percent)

Sea Shore
अग्निशमन दलाच्या जवानांना सुरक्षा भत्ता; मुख्यमंत्री सावंतांच 'गिफ्ट'

केंद्रीय भु विज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या अहवालात ही बाब उघड झाली आहे. 2014 - 15 च्या अहवालात ही झीज 17 टक्के होती मागच्या चार वर्षात त्यात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे देशातील इतर किनारपट्टीच्या झिजीच्या तुलनेत गोव्यातील ही (19.2 टक्के) झीज सर्वात कमी आहे.

Sea Shore
लोकसभा निवडणुकांसाठी भाजपची तयारी सुरू: तानावडे

गोव्यात (Goa)139 किमी किनारपट्टी असून समुद्र आणि नद्या यांचा एकत्रित परिणाम पाहिल्यास एकूण 26.8 टक्के तट खचून गेला असल्याचे या अहवालात म्हटले आहेत. जागतिक तापमानात झालेल्या वाढीमुळे दर्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने किनारपट्टी खचत असून अवैध बांधकामे आणि अन्य कारणासाठी किनारपट्टी वरील वाळूच्या टेकड्या कापल्या गेल्याने समुद्राचे (Sea) पाणी किनारपट्टीत आत शिरून किनारा ग्रस्त करू लागले असल्याचे सांगितले जाते.

सात वर्षांपूर्वी गोव्यातील किनारपट्टीचा अभ्यास केला असता 24 टक्के किनारपट्टी धोक्याच्या कक्षेत असल्याचे दिसून आले होते. तर आताच उपाय केले नाहीत तर आणखी 60 टक्के किनारपट्टी धोक्याच्या कक्षेत येऊ शकते असा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com