Goa Traffic Police: म्हापसा टॅक्सी स्टॅण्डसमोरील पार्किंग क्षेत्र मोकळे करा; वाहतूक पोलिसांकडून सूचना

वाहतूक पोलिसांकडून सूचना : म्हापसा टॅक्सी स्टॅण्डसमोरील जागा
Mapusa Stand
Mapusa StandDainik Gomantak
Published on
Updated on

येथील टॅक्सी स्टॅण्डसमोरील आराम सोडा लेनमध्ये रेंट अ बाईक व इतर वाहनांद्वारे केल्या जाणाऱ्या पार्किंगवर कारवाई करण्यासाठी, म्हापसा वाहतूक पोलिसांनी या वाहनमालकांसह संबंधितांना हे पार्किंग क्षेत्र मोकळे करण्याच्या सूचना केल्या आहेत. ही जागा सार्वजनिक पार्किंगसाठी आता अधिसूचित केली आहे.

Mapusa Stand
Salgaon Waste Project: साळगाव प्रकल्पात दक्षिण गोव्यातील कचरा? स्थानिकांनी कचरावाहू ट्रक रोखला!

दरम्यान, दोन दिवसांत वाहने न हटविल्यास सोमवारपासून (ता.१४) वाहतूक पोलिसांकडून संबंधित वाहनमालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सध्या आराम सोडा स्टॉल्सजवळील मोकळ्या जागेचा वापर रेंट अ बाईक व इतर वाहनांद्वारे पार्किंगसाठी वापर केला जात आहे. तर, दुसरीकडे सर्वसामान्यांना रिकामे पार्किंग स्लॉट (जागा) मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

पे-पार्किंग स्थळ अधिसूचित

काही वाहने बराच वेळ यास्थळी पार्क केली जात होती. यामध्ये रेंट अ बाईक तसेच रेंट अ कार यांचाही समावेश दिसतो. संबंधितांना त्यांची वाहने हटविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेळ देण्यात आला आहे.

Mapusa Stand
Goa News: भारताला संधींची भूमी बनवूया; पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर

सोमवारपासून कायदेशीर कारवाई सुरू करु. कारण, हे स्थळ आता सार्वजनिक पे-पार्किंग म्हणून अधिसूचित केले आहे. व्यावसायिक हेतूसाठी नाही, असे वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पालिकेचे दुर्लक्ष : उपलब्ध माहितीनुसार, म्हापसा वाहतूक पोलिसांनी यापूर्वी म्हापसा पालिकेला पत्र लिहून सामान्य लोकांसाठी हे क्षेत्र पार्किंग क्षेत्रात बदलण्याची सूचना केली होती. त्यानुसार हा परिसर म्हापसा पालिकेने पे-पार्किंगसाठी प्रस्तावित केला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने दिवसभर मोठ्या संख्येने दुचाकी वाहने या भागात पार्क करून ठेवली जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com