मुरगांव नगरसेवक दयानंद नाईक यांच्या कडुन स्वच्छता मोहीम

दामोदर नाईक स्वच्छता मोहीमेत सक्रिय
Cleaning campaign by Murgaon corporator Dayanand Naik
Cleaning campaign by Murgaon corporator Dayanand NaikDainik Gomantak
Published on
Updated on

मुरगांव नगरपालिकेच्या (Murgaon Municipality) व मंत्री श्री मिलिंद सगुण नाईक यांच्या वरदहस्तामुळे स्वच्छता मोहीम (Cleaning campaign) ही सर्व नगरसेवकानी जोर लावल्यामुळे लोकांमध्ये खुप समाधान व्यक्त केले जात आहे. वाॅर्ड क्रमांक दोन मधील नगरसेवक श्री दयानंद नाईक हेडलॅन्ड सडा यांनी आपल्या प्रभागात सध्या जोरदार मुसंडी मारली आहे, तसेच प्रभाग क्रमांक एक ची नगरसेविका सौ. मंजुशा पिळणकर हिचीही स्वच्छता मोहीम मुरगांव हारबर ते एमपीटी कॉलनी पर्यंत सुरू आहे.

सड्यावरील प्रभाग क्रमांक 3 मधील नगरसेविका सौ कृणाली मांद्रेकर उर्फ ह्यापण स्वच्छता मोहीमेत सक्रीय आहेत. तर सड्यावरील प्रभाग चार मधील नगरसेवक श्री दामू कासकर हे स्वतः नगराध्यक्ष असल्यामुळे ते पण आपल्या वाॅर्ड मध्ये सध्या जोरदार कामगिरी ह्या मोहिमे अंतर्गत करतात. रुमडावाडा येथील प्रभाग 5 चे नगरसेवक दामोदर नाईक हे सुद्धा स्वच्छता मोहीमेत खुपच सक्रिय असून, बोगदा येथील 6 सहाचे नगरसेवक प्रजय मयेकर हे युवा असल्यामुळे ह्या मोहिमेत मोठ्या हौसेने सामील होऊन सर्व सफाई कामगारांकडुन चोख कामगिरी करुन घेत असतात.

Cleaning campaign by Murgaon corporator Dayanand Naik
गणेशभक्तांनी 'कोविड' नियमांचे पालन करावे: मुख्यमंत्री डॉ.सावंत

तर बायणा येथील प्रभाग 8 चे नगरसेवक रामचंद्र कामत हे पण ह्या स्वच्छता मोहीमेत हिरिरीने भाग घेत असतात. आणी सर्वात महत्वाचे म्हणजे नगरविकास मंत्री श्री मिलिंद सगुण नाईक ह्यांचा ह्या सर्वांना जोरदार पाठींबा मिळतो, तसेच भाजपा कार्यकर्ते संदिप मालवणकर, उज्वला रविकुमार, सगुण नाईक सडा असे कित्येक भाजपा मुरगांवचे कार्यकर्ते अशा स्वच्छता मोहीमेत खुपच सक्रिय असलेले आढळतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com