Bandol Lake: बांदोळे तळे प्रदूषित; गणेशमूर्ती विसर्जनाबाबत ग्रामस्थांमध्ये शंका

Sancoale: पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी त्वरित निर्देश देऊन बांदोळे तळ्यातील कचरा व गाळ उपसण्याचे काम सुरू केले आहे
Sancoale: पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी त्वरित निर्देश देऊन बांदोळे तळ्यातील कचरा व गाळ उपसण्याचे काम सुरू केले आहे
Bandol LakeDainik Gomantak
Published on
Updated on

Bandol Lake Cleaning

वास्को: गावकऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी त्वरित निर्देश देऊन बांदोळे तळ्यातील कचरा व गाळ उपसण्याचे काम सुरू केले आहे. तरीही तळ्यातील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याने तळ्यात गणपती विसर्जन करावे की इतरत्र करावे, यासंबंधी निर्णय एक-दोन दिवसांमध्ये गावकरी घेणार आहेत.

झुआरीनगर व इतर भागांतील कचरा पावसाच्या पाण्यासह वाहून सांकवाळ येथील बांदोळे तळ्यात जमा झाल्याने यंदा तेथे गणपती विसर्जन करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. बांदोळे तळ्यात सांकवाळ व परिसरातील सुमारे दीड हजार गणपतींचे विसर्जन करण्यात येते. गेल्या कित्येक वर्षांपासून या तळ्याचा वापर विसर्जनासाठी करण्यात येतो.

या तळ्यात गणपती विसर्जन केल्यावर भाविक तळ्यातील पाणी पेल्यामध्ये भरून घरी नेतात आणि ते पाणी तीर्थ म्हणून पितात; परंतु यंदा त्या भाविकांसमोर मोठी अडचण उभी राहिली आहे. पावसाच्या पाण्यासह मोठ्या प्रमाणात कचरा वाहत या तळ्यात जमा झाला आहे. त्यामुळे तळ्यातील पाण्याला उग्र वास येत आहे.

हा कचरा सांकवाळ पंचायतीच्या सामग्री पुनर्प्राप्ती सुविधा (एमआरएफ) केंद्राचा असल्याचा दावा सांकवाळचे पंच तुळशीदास नाईक यांनी केला आहे. या केंद्रातर्फे दारोदारी कचरा गोळा केला जात नाही, त्यामुळे रहिवासी आपला कचरा ठिकठिकाणी टाकतात.

हा कचरा दररोज उचलण्याऐवजी संबंधित कामगार आठवड्यातून एकदा गोळा करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा या केंद्रामध्ये जमा होऊ लागला आहे. जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी तो कचरा पावसाच्या पाण्यामधून वाहत बांदोळे तळ्यामध्ये येतो, असे नाईक म्हणाले.

कचरा ‘एमआरएफ’ केंद्राचा?

पंच मौर्लिओ कार्वाल्हो यांनी हा कचरा एमआरएफ केंद्राचा असल्याचा दावा केला. तेथील कचरा पाण्यासह वाहून या तळ्यात आला आहे. पंचायतीने हा कचरा काढण्याची गरज होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

पंच निधी नाईक यांनीही या प्रदूषित पाण्यामध्ये गणपती विसर्जन कसे करावे, असा प्रश्न उपस्थित केला. गणपती विसर्जनासाठी कोणी या पाण्यात उतरल्यास त्याला त्वचारोगाला सामोरे जावे लागण्याची भीतीही यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली आहे.

Sancoale: पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी त्वरित निर्देश देऊन बांदोळे तळ्यातील कचरा व गाळ उपसण्याचे काम सुरू केले आहे
Carambolim Lake: पाणथळ अधिसूचित होऊनही करमळी तळे अद्याप वन खात्याकडेच! शेतकऱ्यांच्या समस्या कायम

याप्रकरणी पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यासमोर समस्या मांडल्यावर त्यांनी त्वरित तेथील कचरा व गाळ उपसण्याचे निर्देश संबंधित खात्याला दिले. त्यानंतर जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांनी तेथे येऊन पाहणी केली. आता तेथे मशिनद्वारे कचरा व गाळ उपसण्याचे काम सुरू झाले आहे.

मात्र, तळ्यातील पाणी प्रदूषित झाल्याने व त्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने गावकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रदूषित पाण्यात गणपती विसर्जन करणे, त्यानंतर ते पाणी तीर्थ म्हणून पिणे वगैरे गोष्टी त्यांच्या मनाला पटणार नाही, असे पंच नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com