Sustainable Poultry: 'स्वच्छ म्हापसा'साठी पोल्ट्री संघटनेचा नवा फॉर्म्युला; चिकनच्या टाकाऊ कचऱ्यावर होणार वैज्ञानिक प्रक्रिया

Mapusa Chicken Waste Processing:अ खिल गोवा पोल्ट्री विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन समस्येचे गांभीर्य पटवून दिले
 Goa poultry new
Goa poultry newDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: दोन दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनकडून म्हापसा परिसरातील चिकन विक्रेत्यांवर अस्वच्छतेच्या तक्रारींवरून कारवाई करत काही दुकाने तातडीने बंद करण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर आता अखिल गोवा पोल्ट्री विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन समस्यांचे गांभीर्य पटवून दिले.

चिकन व्यवसायातून तयार होणारा टाकाऊ कचरा पालिकेमार्फत गोळा न केल्याने अनेक व्यवसायिक हा कचरा उघड्यावर टाकत असल्याच्या समस्येकडे पालिकेचे लक्ष वेधण्यात आले, अशा कचऱ्यामुळे परिसरात घाण आणि दुर्गंधी निर्माण होऊन आजारांचा धोका निर्माण होत असल्याचा दावा पोल्ट्री विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

 Goa poultry new
Vertical Forest: गोव्यात मोठ्या इमारतींना ‘व्हर्टिकल फॉरेस्ट’ संकल्पना सक्तीची, मंत्री राणेंची घोषणा; भिंतीवर बहरणार गर्द हिरवाई

त्यांची समस्या ऐकून घेतल्यानंतर या बैठकीत संघटनेने पालिकेला सहकार्य करण्याची ग्वाही दिली असून, चिकन विक्रेत्यांनी देखील उघड्यावर कचरा न टाकण्याचे आश्वासन दिले आहे.

‘स्वच्छ भारत नितळ गोय’ मोहिमेअंतर्गत कचरा संकलन

अखिल गोवा पोल्ट्री विक्रेते संघटनेने स्वच्छ भारत नितळ गोय मोहिमेअंतर्गत चिकनचा कचरा थेट दुकानांवरूनच गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे. व्यवसायिकांकडून किमान पैसे आकारून हा कचरा संकलित केला जात असून, त्याची प्रक्रिया पिसुर्ले औद्योगिक वसाहतीमधील गोवा प्रोटीन सोल्युशन्सकडे केली जाते. ही प्रक्रिया पूर्णपणे वैज्ञानिक असून, पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित आहे.

संघटनेने म्हापसातील सर्व चिकन विक्रेत्यांना आपल्या संघटनेचे सदस्यत्व घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच म्हापसा पालिकेने देखील नोंदणी नसलेल्या दुकानदारांवर आणि उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. तसेच, चिकन कापणे तात्पुरते बंद ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

“स्वच्छता राखण्यासाठी आमची संघटना काम करत आहे. चिकन व्यवसायिकांचा कचरा पर्यावरणपूरक पद्धतीने व्यवस्थापित करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. पालिकेनेही सहकार्य केल्यास ही समस्या कायमस्वरूपी सुटू शकते.” पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष प्रिस्को सेगुरिना यांनी सांगितले. पालिकेने संघटनेच्या या उपक्रमाचे स्वागत करत सर्व व्यवसायिकांनी निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com