Vertical Forest: गोव्यात मोठ्या इमारतींना ‘व्हर्टिकल फॉरेस्ट’ संकल्पना सक्तीची, मंत्री राणेंची घोषणा; भिंतीवर बहरणार गर्द हिरवाई

Green Buildings Goa: मंत्री विश्र्वजीत राणे यांनी जाहीर केले की, ज्या इमारतींचा चटई निर्देशांक ३०० आहे, त्या सर्व इमारतींना ‘चटई निर्देशांक व्हर्टिकल फॉरेस्ट’ संकल्पनेनुसार बांधणी करावी लागणार आहे.
Vertical Forest Goa News
Green Buildings GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील शहरी विकासाला हरित व शाश्वत दिशा देण्यासाठी ‘व्हर्टिकल फॉरेस्ट’ ही संकल्पना आता सक्तीची करण्यात येणार आहे. नगरविकास मंत्री विश्र्वजीत राणे यांनी जाहीर केले की, ज्या इमारतींचा चटई निर्देशांक ३०० आहे, त्या सर्व इमारतींना ‘चटई निर्देशांक व्हर्टिकल फॉरेस्ट’ संकल्पनेनुसार बांधणी करावी लागणार आहे. या संकल्पनेत इमारतींच्या भिंती, बाल्कनी तसेच गच्च्यांवर झाडे व हरित रोपांची लागवड केली जाते, ज्यामुळे त्या इमारतींना हरित जंगलाचे रूप मिळणार आहे.

...अन्यथा भोगवटा प्रमाणपत्र नाही

मंत्री राणे यांनी स्पष्ट केले की, वन, नगर व ग्राम नियोजन तसेच नगरविकास ही तीन महत्त्वाची खाती परस्पर समन्वयाने काम करून ‘व्हर्टिकल फॉरेस्ट’ ही योजना राबवतील. जोपर्यंत एखाद्या प्रकल्पात व्हर्टिकल फॉरेस्टचे निकष पूर्ण केले जात नाहीत, तोपर्यंत त्या इमारतीस ‘भोगवटा प्रमाणपत्र’ दिले जाणार नाही.

Vertical Forest Goa News
Climate Change In Goa: एकेकाळी पणजी जगातील सुंदर शहर होते! पण आता? तापमानवाढ आणि हरित फुफ्फुसांची संकल्पना

कसे असते व्हर्टिकल फॉरेस्ट

ही संकल्पना इटलीच्या वास्तुविशारद स्टेफानो बोएरी यांनी मांडली. यात उंच इमारतींवर झाडांची लागवड करून नैसर्गिक थंडावा, प्रदूषण नियंत्रण, ऑक्सिजन निर्माण आणि जैवविविधतेचा विकास साधता येतो.

Vertical Forest Goa News
Goa Green Buildings: कॉंक्रिटीकरणाने ग्रस्त झालेल्या गोव्यासाठी ‘हरित इमारत’ हाच पर्याय, पुढाकार घेणे गरजेचे

..तर गोवा प्रथम राज्य!

भारतामध्ये ही संकल्पना प्रमुखतः बंगळुरू, मुंबई, पुणे आणि विशेषतः सिंगापूरच्या धर्तीवर नोएडा आणि गुजरात ग्रीन सिटीमध्ये काही प्रमाणात राबवली जात आहे. मात्र, गोवा हे पहिले राज्य ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com