Goa Poultry Rate : दरामध्ये एकवाक्यता अन् आरोग्यदायी चिकनवर भर!

गोवा पोल्ट्री फार्मर्सवाल्यांनी भरला बाहेरील ट्रेडर्सना दम
goa
goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Poultry Rate : फोंडा, दरात एकवाक्यता ठेवण्यासाठी तसेच ग्राहकांना सुरक्षित व आरोग्यदायी ‘चिकन'' उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पोल्ट्री फार्मर्सवाल्यांनी गोमंतकीय असोसिएशनच्या अंतर्गत काम करावे, अन्यथा सरकारच्या मदतीने पुढील कारवाई करू, असा इशारा अखिल गोवा पोल्ट्री फार्मर्स व ट्रेडर्स असोसिएशनने दिला आहे.

फोंड्यात आज झालेल्या असोसिएशनच्या पहिल्या आमसभेत फार्मर्सवाले तसेच दुकानदारांच्या विविध समस्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. बाहेरील पोल्ट्री ट्रेडर्सनी गोमंतकीय ट्रेडर्सवाल्यांना सहकार्य करण्याचे मान्य केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राज्यातील पोल्ट्री क्षेत्रातील अनागोंदी दूर करण्यासाठी पोल्ट्री असोसिएशन पुढे सरसावली असून बांगला देशस्थित चिकनवाल्यांकडून जागा मिळेल तेथे स्टॉल थाटले जात असून या बेकायदेशीर स्टॉलमुळे दरात तफावत निर्माण झाली आहे.

मूळात जागा मिळेल तेथे चिकनचे स्टॉल थाटण्याच्या प्रकारामुळे सुरक्षित व आरोग्यासाठी उपयुक्त चिकन मिळणे मुश्‍कील झाले आहे. बाहेर स्टॉल टाकण्याच्या प्रकारामुळे दरातही तफावत असून ग्राहकांना खूष करण्यासाठी हे आरोग्यासाठी घातक चिकन कमी दराने विकले जाते. मात्र, ग्राहकांना त्याचे दुष्परिणाम समजत नाही. त्यामुळे सुरक्षित आणि आरोग्यासाठी चांगले असलेले चिकन विकत घ्या, असे आवाहन या असोसिएशनतर्फे ग्राहकांना करण्यात आले आहे.

फोंड्यातील मार्केट यार्डमधील सभागृहात जयकृष्ण नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला मोठ्या संख्येने ट्रेडर्स तसेच दुकानदार उपस्थित होते. राज्यातील पोल्ट्री फार्मर्सवाल्यांना अनेक समस्या सतावत असून राज्य सरकारने हा व्यवसाय वाढवण्यासाठी या व्यवसायातील लोकांना अनुदान देणे गरजेचे आहे.

राज्यात सध्या साठ टक्के फार्मर्स बाहेरून काम करीत असून गोमंतकीय फार्मर्सवाल्यांच्या रोजीरोटीवर परिणाम होत आहे, त्यामुळे हा विषय सरकारकडे नेऊन अनुदानावर भर दिला जाईल, असे जयकृष्ण नाईक म्हणाले. सभेला अनेकांनी मार्गदर्शन केले.

goa
Goa Crime News: डिचोलीत महिलेचा विनयभंग; अद्याप कारवाई न केल्याने कॉंग्रेसची पालिकेवर धाड

पोल्ट्री फार्मर्सची समिती

अध्यक्ष जयकृष्ण विश्‍वनाथ नाईक, उपाध्यक्ष ओलीन पावल बार्रेटो व तुषार तुळशीदास नाईक. सचिव दामोदर वसंत बावचीकर, सहसचिव अनिषा जेनू नाईक, खजिनदार दीपक दामोदर देसाई, सहखजिनदार किशोर विष्णू पालकर. समिती सदस्य - साईदीप रघुनाथ नाईक, विशांत योगानंद नाबर, मेक्रो वालादारीस, अँड्रिसन आंताव, अभय आनंद शिरोडक, अरुण शेट्टी, प्रभंजन सदानंद पार्सेकर व मारियानो सौझा.

रोज सव्वालाख किलो चिकन

राज्याला सध्या रोज सव्वालाख किलो चिकनची, तर सहा लाख अंड्यांची गरज भासते. मात्र, गोव्यात उत्पादन कमी असल्याने बाहेरील राज्यातून लोक गोव्यात पुरवठा करतात, पण हा पुरवठा करताना मात्र दरात तफावत केली जाते. त्यामुळे दरात एकवाक्यता आणून ग्राहकांना रास्त व स्वस्त दरात चिकन उपलब्ध व्हावे यासाठी असोसिएशन काम करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com