Goa Board Exam: धावी, बारावी'च्या भुरग्यांखातीर सुशेगाची गजाल; येत्या वर्षापासून ताण कमी होणार

दहावी, बारावीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर
Goa Board Exam Date Announced
Goa Board Exam Date AnnouncedDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Board Exam: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (GBSHSE) दहावी आणि बारावीच्या इयत्तांची दुसरी आणि अंतिम सत्र परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही परिक्षा अनुक्रमे 1 एप्रिल व 15 मार्चपासून सुरु होणार आहे.

याबाबतची माहिती गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली. तसेच पुढील 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून दोन परिक्षांची पध्दत बंद करण्यात येणार आहे.

Goa Board Exam Date Announced
Akash Naik Rangoli : शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत साकारला भव्य 3-डी ॲनाकोंडा; गोमंतकीय आकाशची कलाकृती

भगीरथ शेट्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावी आणि बारावीची दुसरी आणि अंतिम सत्र परिक्षा अनुक्रमे 1 एप्रिल व 15 मार्चपासून सुरु होणार आहे. तर 16 फेब्रुवारीपासून बारावीची प्रात्यक्षिक परिक्षा घेण्यात येणार आहे.

बारावी परीक्षेचा निकाल 30 एप्रिलपयर्यंत तर दहावीच्या परिक्षेचा निकाल 25 मे पर्यंत लावण्यात येणार आहे. बारावीची प्रात्याक्षिक परीक्षा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. यात फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी, कॉम्प्युटर, सायन्स, जॉग्रॉफी, बॅकींग या सात विषयांचा समावेश आहे.

Goa Board Exam Date Announced
Sanquelim : दुचाकीवरुन निघालेल्या दाम्पत्याचा अपघातात दुर्देवी अंत; 1 वर्षाच्या चिमुरड्याचा हात फ्रॅक्चर

1 एप्रिल पासून सुरु होणारी परिक्षा 20 ते 25 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. तसेच 2023-24 पासून दोन परिक्षांची पध्दत पुढील शैक्षणिक वर्षापासून बंद करण्यात येणार आहे. गेली दोन वर्षे दहावी, बारावी या दोन्ही इयत्तांसाठी प्रथम दुसरे सत्र अशा दोन परिक्षा घेण्यात येत होत्या. पुढील शैक्षणिक वर्षापासून एकच परिक्षा पध्दती सुरु करण्यात येणार आहे अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com