पणजी : राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणाखाली आली असली, तरी मृत्यूचे प्रमाण काही अंशी सुरूच असल्याने सरकारने एक आठवडाभर म्हणजे 2 ऑगस्ट सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीत (Goa Curfew) वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दिली. (Citizens who have taken 2 doses of vaccination will get entry in Goa)
संचारबंदीची मुदत आज, 26 जुलैला सकाळी 7 वा. संपत आहे त्या अनुषंगाने पुन्हा ही वाढ करण्यात आली आहे. अजूनही राज्यातील कॅसिनो, सभागृह, कम्युनिटी हॉल किंवा तत्सम जागा, रिव्हर क्रूझ, वॉटर पार्क, करमणूक उद्याने, स्पा, मसाज पार्लर, सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स, शॉपिंग मॉल्समधील मनोरंजन झोन असलेल्या व्यावसायिकांना या आदेशात सूट देण्यात आलेली नाही.
संचारबंदी, पण कारवाई कुठे?
संचारबंदी लागू असताना सरकारने कोविड - 19 च्या मार्गदर्शक नियमांचे पालन करण्याचे निर्देश देऊनही बाजारपेठा, विवाह सोहळे व काही कार्यक्रमांत सूचनांचे पालन होत नसताना दिसत आहे. पोलिस तसेच जिल्हाधिकारी यंत्रणाही कारवाई करण्यात सक्रिय नसल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश
राज्यात कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांनाच गोव्यात प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, आज सरकारने कर्फ्यूमध्ये वाढ करताना दोन्ही डोस (लसीकरण) घेऊन 14 दिवस उलटलेल्यांनाही गोव्यात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून लागू करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.