श्रीगणेशाचे स्वागत आम्ही खड्ड्यांतून करायचे का? चतुर्थीपूर्वी चांगले रस्ते करा; गणेशभक्तांची अपेक्षा

Ganesh Chaturthi 2024: तीन दिवसांत शक्य होईल तेवढे रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी लोकांकडून होत आहे
Ganesh Chaturthi 2024: तीन दिवसांत शक्य होईल तेवढे रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी लोकांकडून होत आहे
Goa Bad RoadsDainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Chaturthi 2024

पणजी: पणजी ते म्हापसा राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावर असलेले खड्डे बुजविण्यात सरकारला यश आले आहे. परंतु आतील मार्गांवर असलेले खड्डे बुजवून चतुर्थीपूर्वी आम्हाला चांगला रस्ता वाहतुकीसाठी द्यावा, अशी मागणी लोकांकडून होऊ लागली आहे.

गणेश मूर्ती घरी आणताना गणेशाचे स्वागत आम्हाला खड्ड्यांतून करायचे नाही असे अनेक गोमंतकीयांचे म्हणणे आहे. आमदार नीलेश काब्राल हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी २०२३ मध्ये रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजविले जाणार असे आश्वासन दिले होते. त्यांना मंत्रिपदावरून हटविल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा खात्याची जबाबदारी सांभाळली. मुख्यमंत्र्यांनी देखील रस्ते लवकर दुरुस्त होतील असे आश्वासन दिले आणि दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचे प्रयत्न देखील सुरू केले आहेत.

Ganesh Chaturthi 2024: तीन दिवसांत शक्य होईल तेवढे रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी लोकांकडून होत आहे
Ganesh Chaturthi 2024: ‘हरित चतुर्थी’ साजरी करा! पीओपीच्‍या मूर्ती, प्‍लास्‍टिक वापर टाळा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

तीन दिवस बाकी...

मुख्यमंत्री आता स्वतः सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत. हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण हा गणेश चतुर्थी असतो. हे लक्षात घेऊन इतर कामांना काही काळ मागे सारून रस्ते चकाचक करण्यावर प्रथम लक्ष द्यायला हवे होते. आता केवळ तीन दिवस बाकी उरले आहे. या तीन दिवसांत शक्य होईल तेवढे रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी लोकांकडून होत आहे.

स्मार्ट रस्त्यांची स्थिती खराब

स्‍मार्ट सिटीअंतर्गत राजधानीतील रस्‍ते बांधले, परंतु हे रस्‍ते स्‍मार्ट आहेत असे दिसून येत नाहीत. पोलिस मुख्‍यालय व महालक्ष्‍मी मंदिराजवळील रस्‍ता प्रामुख्‍याने पाहिल्‍यास इतर रस्‍त्‍यांची अवस्‍था लक्षात येईल. रस्‍ते बांधकाम करण्यासाठी उत्तम दर्जाचे साहित्‍य वापरणे गरजेचे होते, मात्र ते वापरले गेले नसल्‍याचे प्रथम दर्श्‍ानी रस्‍ता पाहिल्‍यावर लक्षात येते.

राज्यातील मुख्य रस्त्यांवर अधिक खड्डे दिसतात. किमान चतुर्थीपुर्वी हे खड्डे बुजवले जाणार अशी अपेक्षा होती, परंतु गणेश मूर्तीचे स्वागत खड्ड्यातून होणार आहे असे वाटते. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते पण अंमलबजावणी काही होताना दिसली नाही, त्यामुळे लोक निराश आहेत.

सिद्धांत माने, मेरशी

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पाऊसामुळे खड्डे बुजविण्यास अडचणी येत आहेत.आमचा सरकारवर विश्वास आहे, पाऊस कमी झाल्यास खड्डे बुजविण्याच्या कामास गती मिळेल. दरवेळी सरकारला दोष न देता निसर्गाची साथ मिळते की नाही ते पाहावे.

सूरज नाईक, पणजी

राज्यात हल्ली बांधलेल्या प्रमुख रस्त्यांवर अधिकतर खड्डे दिसून येतात. जे रस्ते दहा वर्षापूर्वी बांधले आहेत ते अजूनही चकाचक आहे. रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य हे बहुतेक दुय्यम दर्जाचे असावे असा संशय येतो.

सुकाजी नाईक, मांद्रे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com