पाणी टंचाईने नागरिक त्रस्त, दाबोळी-कुठ्ठाळी वासीयांची वणवण

वाढीव बिलांची रक्कम कमी करत नाही तोपर्यंत पाण्याचे बिल भरले जाणार नाही असा इशारा देखील यावेळी नागरिकांनी दिला आहे.
Water Problem

Water Problem

Dainik gomantak

Published on
Updated on

ऐन नाताळ सणासुदीच्या काळात कुठ्ठाळीत पाण्याच्या टंचाईने नागरिक त्रस्त आहेत. पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडून नाताळ सण साजरा करण्यास मोकळीक द्यावी, अशी मागणी कुठ्ठाळी वासीयांनी केली आहे. राज्यात सध्या पाण्याच्या वाढीव बिलाबरोबर पाण्याच्या टंचाईने लोकांना हैराण करून सोडले आहे. मुरगाव तालुक्यातील दाबोळी तसेच आता कुठ्ठाळी वासीयांनाही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

<div class="paragraphs"><p>Water Problem</p></div>
अर्जुन वेळीप यांच्या आव्हान अर्जावर 7 जानेवारीला सुनावणी

पाणी (water) नळाला नसताना वाढीव पाण्याची बिले लोकांच्या माथी मारल्याने लोक हैराण झाले आहे. यात दाबोळी (Dabolim) वासीयांनी दोन वेळा बायणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागात मोर्चा वळवून अभियंत्याला घेराव घालून वाढीव बिलाबाबतीत जाब विचारला आहे. जोपर्यंत वाढीव बिलांची रक्कम कमी करत नाही तोपर्यंत पाण्याचे बिल भरले जाणार नाही असा इशारा देखील यावेळी नागरिकांनी (Citizen) दिला आहे.

<div class="paragraphs"><p>Water Problem</p></div>
मडगावचे दोन नगरसेवक तृणमुलमध्ये दाखल

दरम्यान, ऐन नाताळ (Christmas) सणासुदीच्या काळात कुठ्ठाळी वासियांना पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असून पाण्याविना कुठ्ठाळी वासीयांचे हाल झाले आहेत. येथील लोक जास्त ख्रिस्ती बांधव असून नाताळ सणात फरावळ करण्यासाठी लोकांना बिसलेरी पाण्याचा उपयोग करावा लागतोय. आधीच पाणी नसताना वाढते पिण्याचे बिल व आता बिसलेरी पाण्याचे बिल यामुळे पाण्यासाठी पायपट पैसे मोजावे लागत आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी लोकांनी पाणी विभागाच्या अभियंत्याला घेराव घालून जाब विचारला होता. मात्र, ते लोकांची समस्या सोडवू शकले नाहीत. आज परत एकदा लोक रस्त्यावर उतरून नाताळ सणात पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com