Goa Electricity Department: संतप्त चिंचोणेवासीयांनी अभियंत्‍याला घातला घेराव

Electricity Office Citizen's Siege: वारंवार वीज खंडित होत असल्याने विचारला जाब
Electricity Office Citizen's Siege: वारंवार वीज खंडित होत असल्याने विचारला जाब
Goa Electricity Department Citizen Siege Dainik Gomantak
Published on
Updated on

सध्‍याच्‍या पावसाळ्‍याच्‍या दिवसांत चिंचोणे पंचायत क्षेत्रात वारंवार वीज खंडित होण्‍याचे प्रकार घडत आहेत. याबाबत वीज कार्यालयात तक्रार केली तरीही त्‍याची त्‍वरित दखल कोणी घेत नाही, असा आरोप करत आज गुरुवारी चिंचोणेचे सरपंच वालेंतिन बार्रेटो, अन्‍य पंच आणि ग्रामविकास समितीच्‍या सदस्‍यांनी वीज खात्‍याचे कार्यकारी अभियंता संतोष सावंत यांना घेराव घालून जाब विचारला.

वेळ्‍ळी भागात काही झाडे कोसळून वीजतारांवर पडल्‍याने वीजपुरवठा खंडित झाला होता. आता या भागाला कुंकळ्‍ळी फिडरवरून पर्यायी वीज देण्‍यात आली असून या समस्‍येवर तात्‍पुरता तोडगा काढण्‍यात आला आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली.

या भागात ३० कोटी रुपये खर्चून भूमिगत वीजवाहिन्‍या टाकण्‍यात आल्‍या असून ९५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. पुढील एका महिन्‍यात हे काम पूर्ण होणार. त्‍यानंतर लगेच ही भूमिगत वीजवाहिनी विद्युतभारीत करण्‍यात येणार आहे.

त्‍यानंतर चिंचोणेच नव्‍हे तर वार्का, ओडली आणि केळशी पंचायत क्षेत्रातील वीज समस्‍याही मार्गी लागणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.

अशी ही ‘बनवाबनवी’

वीज खात्‍याने झाडांच्‍या फांद्यांची छाटणी योग्‍य प्रकारे केलेली नाही. त्‍यामुळेच पावसाळ्‍यात वादळी वारा आला की या फांद्या तुटून वीजतारांवर पडून वीज खंडित होते. वीज खात्‍याचे कनिष्‍ठ अभियंता शैलेश मुळगावकर यांनी मान्‍सूनपूर्व कामे योग्‍य प्रकारे केली असल्‍याचा खोटा अहवाल सादर केला असल्‍याचा आरोप ग्रामस्‍थांनी केला असून त्‍यामुळेच हे असे प्रकार वारंवार घडतात असा दावा केला.

Electricity Office Citizen's Siege: वारंवार वीज खंडित होत असल्याने विचारला जाब
Goa Electricity Department: वीज ग्राहकांना ‘शॉक’

संतोष सावंत, वीज अभियंता

चिंचोणेत ३० कोटी रुपये खर्चून भूमिगत वीजवाहिन्‍या टाकण्‍यात आल्‍या असून ९५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. पुढील एका महिन्‍यात हे काम पूर्ण होईल. त्‍यानंतर चिंचोणेच नव्‍हे तर वार्का, ओडली आणि केळशी पंचायत क्षेत्रातील वीज समस्‍या मार्गी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa ST Assembly Reservation News
Ponda Municipality Golden Jubilee
14 Electricity Employees Suspension Goa
B L Santosh Visit Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com