फोंड्यातील नागरिक ‘आगीतून फुफाट्यात’

वीज गूल: कर्मचाऱ्यांचे तक्रारीकडे दुर्लक्ष; ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे
Power problem in  Ponda
Power problem in PondaDainik Gomantak

मिलिंद म्हाडगुत

फोंडा: फोंड्यात सध्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले असून उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यातच वीज पुरवठा कधी पूर्ववत होणार अशी विचारणा केल्यास वीज कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने फोंडावासीयांची अवस्था ‘आगीतून फुफाट्यात’, अशी झाली आहे. रात्री अपरात्रीही वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे लोकांना झोपायलाही मिळेनासे झाले आहे.

कार्यालयीन वेळात होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे कार्यालयीन कामातही व्यत्यय येऊ लागला आहे. सध्या फोंड्यातील वीज कार्यालय म्हणजे अनागोंदी कारभार, कसा असावा याचा उत्कृष्ट नमूना बनू लागला आहे. कितीही तक्रारी केल्या तरी त्यांच्याकडे कानाडोळा करण्याचे अजब तंत्र या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अवलंबल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Power problem in  Ponda
मोपा विमानतळावरुन पहिलं उड्डाण 15 ऑगस्टला; लिंक रोड मात्र अपूर्णच

फोंडा शहरात वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे घरगुती ग्राहकांबरोबर व्यावसायिक ग्राहकांना त्रास सहन सोसावा लागत आहे. ऐन व्यवसायाच्या वेळीच वीज गेल्यामुळे दुकानदारांच्या व्यवसायात खंड पडतो. आणि वीज नसल्यामुळे ग्राहकही दुकानात येण्यास टाळाटाळ करताना दिसतात. फोंड्याच्या वीज कार्यालयावर सध्या कोणाचा वचक नसून त्यामुळे त्यांचा मनमानी कारभार मागील पानावरून पुढे सुरूच आहे.

वीज कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाच्या वृत्तीमुळे पावसाळ्यात तर आणखी त्रासाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी फोंड्यात भूमीगत वीजवाहिन्या टाकण्याचे सुतोवाच केले आहे. या त्यांच्या घोषणेचे सर्व थरातून स्वागत होत असून आता त्यांनी फोंड्याच्या वीज कर्मचाऱ्यांना कानपिचक्या देऊन लोकांची दैनंदिन त्रासातून मुक्तता करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Power problem in  Ponda
नवीन शैक्षणिक धोरणावर 'वेळगे'त कार्यशाळा

मान्सूनपूर्व कामांना सुरवातच नाही !

मान्सूनपूर्व कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. याबाबत आचारसंहितेची सबब देत असले तर आचारसंहिता संपून आता महिना उलटला आहे. पण सध्या या वीज खात्याच्या अंधाधुंदी कारभारामुळे लोकांना मानसिक तसाच शारीरीक त्रास सहन करावा लागत आहे. पेट्रालचे दर वाढत असताना विजेचे दरही वाढल्यामुळे तेही लोकांना डोकेदुखी ठरणार आहे. दर वाढल्यामुळे वीजखात्याने सेवा तरी अखंडित द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com