अंतिम संस्कार निधी मंजूर करण्यास सरकारकडून टाळाटाळ, नागरिकांमध्ये नाराजी

'या' योजनांचा देखील लाभ अद्याप बऱ्याच धनगर समाज बांधवांना मिळाला नाही
sanction funeral fund
sanction funeral fundDainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले - राज्य सरकारने समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून धनगर समाजाला आधार देण्यासाठी सुरू केलेल्या योजना या समाजा पर्यंत पोचत नसल्याच्या तक्रारी खुप वाढल्या आहेत. यात अत्यंत गंभीर बाब म्हणजे समाजातील व्यक्ती मृत झाल्यास अंत्य संस्कार अर्थ साहाय्य योजने अंतर्गत देण्यात येणारी आर्थिक मदतीचे अर्ज परत पाठवले जात आहेत.

यामुळे गोवा (Goa) धनगर समाज सेवा संघाच्या वतीने नाराजी व्यक्त केली असून, या संबंधी समाज कल्याण खात्याच्या संचालकांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

sanction funeral fund
सर्व शालेय परीक्षा ऑफलाइन मोडमध्ये; मुख्यमंत्री

या संबंधी सविस्तर वृत्त असे की, धनगर समाजाला आदिवासी दर्जा न मिळाल्याने, सन 2012 साली सत्तेवर आलेल्या भाजप (BJP) सरकारने राज्यांतील आदिवासी समाजाला देण्यात येणाऱ्या काही योजना पैकी सन 2013 सालापासून धनगर समाजाला लागू करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये मुलांना शिष्यवृत्ती, नवीन घर बांधणे व दुरुस्ती साठी अनुदान, सांस्कृतिक भवन, मृत्यू झालेल्या व्यक्तीचे क्रियाकर्म करण्यासाठी अंत्य संस्कार अर्थ साहाय्य योजना अशा प्रकारच्या विविध योजनांचा समावेश होता.

त्यावेळी धनगर समाजाने या निर्णयाचे स्वागत करून योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यात आले होते. परंतु, या योजने अंतर्गत घर बांधणे व दुरुस्तीसाठी अनुदान या योजनेचा लाभ अद्याप बऱ्याच धनगर समाज बांधवांना मिळाला नाही, अशा तक्रारी आहेत.

त्याच प्रमाणे सुरवातीला अंतिम संस्कार करण्यासाठी देण्यात येणाऱ्या मदतीचा लाभ काही समाज बांधवांना देण्यात आला, या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी मृत्यू झालेल्या जवळच्या व्यक्तींचे जात प्रमाणपत्रासह, खर्च झालेली बिले व इतर कागदपत्रे सादर करावी लागतात, परंतू काही दिवसांपासून सरकारने अधिसूचित केलेल्या आदेशानुसार सर्व कागदपत्रे सादर करून ही सत्तरी (Satari) तालुक्यातील काही धनगर समाज बांधवांचे अर्ज ना मंजूर करून परत पाठवल्याची माहिती मिळाली आहे.

त्यामुळे सरकार (Government) दुर्बल घटकांसाठी योजना आखते पण अमंलबजावणी करणारे अधिकारी शुल्लक त्रुटी काढून या समाजाची हेळसांड करीत असल्याचे धनगर समाजाचे म्हणणे आहे.

sanction funeral fund
Curd in Periods : पीरियड्स दरम्यान दहयाचे सेवन करावे की नाही

या संबंधी अर्ज परत पाठवलेल्या मृत वडिलांच्या मुलांनी सांगितले की, वडिल निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी व माझी आई हीचा ओबीसी (OBC) दाखला नसल्याने आपल्या नावे अर्ज करून त्याला माझा ओबीसी दाखला जोडून इतर कागदपत्रांसह गोवा धनगर समाज सेवा संघाच्या वतीने समाज कल्याण खात्यात जमा केला होता, परंतू माझ्या आईचा ओबीसी दाखला नसल्याचे कारण पुढे करून सदर अर्ज परत पाठला आहे. परंतु या पुर्वी मृत व्यक्तीच्या ओबीसी असलेल्या कोणीही अर्ज केला त्यांना सदर योजनेचा लाभ दिला आहे, तर आमच्याच बाबतीत वेगळा न्याय का असा प्रश्न त्यांनी येथे उपस्थित केला आहे.

समाज कल्याण खात्याच्या वतीने सत्तरी तालुक्यातील समाज बांधवांचे अंत्य संस्कार अर्थ साहाय्य योजनेचे अर्ज परत पाठवल्याची माहिती मिळाली आहे, परंतू निवडणूकीची (Election) आचारसंहिता लागू असल्याने, या संबंधी समाज कल्याण संचालकांची भेट घेतली नव्हती, पण आता निवडणुका झाल्यानें पुढच्या आठवड्यात गोवा धनगर समाज सेवा संघाच्या वतीने समाज कल्याण संचालकांची भेट घेऊन जाब विचारण्यात येणार आहे.

या पुर्वी मृत व्यक्तीच्या मुलगा, भाऊ किंवा मुलगी यांचे नांवे भरून पाठवलेले अर्ज मंजूर होत होते, परंतू यांच वेळी खात्यांचे नियम कसे काय बदलले यांची चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष बि डी मोटे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com