Chorao Ro Ro Ferry Pass: चोडणवासीयांना 'रो-रो फेरी' महागली! प्रतिट्रीप 5 रुपयांची वाढ; पास होणार वितरित

Ro-Ro Ferry Chorao: चोडणमधील नियमित फेरी बोट प्रवाशांसाठी रो-रोमधील सेवेकरिता ६९ चारचाकी वाहनांना १० रुपयांऐवजी १५ रुपये प्रति ट्रीपचे (फेरी) पास देण्यात आले आहेत.
Ro-Ro Ferry In Goa
Ro-Ro Ferry In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: चोडणमधील नियमित फेरी बोट प्रवाशांसाठी रो-रोमधील सेवेकरिता ६९ चारचाकी वाहनांना १० रुपयांऐवजी १५ रुपये प्रति ट्रीपचे (फेरी) पास देण्यात आले आहेत. याबाबत अधिसूचना अगोदरच जारी केली असून, चार महिन्यांपासून ही सेवा सुरळीतपणे कार्यरत आहे. जे कोणी वाहनधारक राहिले असतील तर त्यांच्याकडे अधिकारी पाठवून त्यांना १५ रुपये दराने दिले जाणारे पास वितरित करता येऊ शकतात, असे मत नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी ‘गोमन्तक''कडे व्यक्त केले.

चोडणच्या रहिवाशांनी रो-रो फेरी भाडे प्रश्नाबाबत सरकारला अल्टिमेटम दिला आहे, ज्यामध्ये गुरुवारपर्यंत यावर तोडगा काढण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्यावर राजभोसले यांची मत जाणून घेण्यात आले. सुरुवातीलाच त्यांनी नदी परिवहन खात्याच्या तोटा व फायद्यावर बोट ठेवले.

त्यांनी सांगितले की, दरवर्षी ८० कोटींचा तोटा सहन करीत आहे आणि फेरीबोट सेवेतून वर्षाला उत्पन्न फक्त ८० लाख रुपये मिळते. उलट इतर राज्यांच्या सेवेपेक्षाही येथील फेरीबोट सेवा स्वस्त आणि मोफत दिली जात आहे, याचाही लोकांनी विचार करणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणतात, चोडणच्या नियमित फेरी प्रवाशांसाठी आमच्या विभागाने पंचायतीकडे जाऊन तेथील वाहनधारकांना ट्रीप पास दिले आहेत.

Ro-Ro Ferry In Goa
Ro Ro Ferryboat: गोव्यात आणखी एका मार्गावर होणार 'रो रो फेरी' सुरु, किती असणार क्षमता? कधी होणार सुरु? जाणून घ्या..

चोडण मार्गावर चालणाऱ्या पारंपरिक फेरींसाठी, प्रवासी फक्त १० रुपये जुने दर देत आहेत, तसेच ठेवण्यात आले आहेत. फक्त ४ चाकी वाहनांसाठी रो-रोतील प्रति ट्रीप ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय दुचाकी आणि प्रवाशांना मोफत सेवा दिली जात आहे. नियमित चोडणकरांसाठी प्रति ट्रीप ३० रुपये आकारले जात नाहीत, हे ग्रामस्थांनी लक्षात घ्यावे, असे ते म्हणाले.

Ro-Ro Ferry In Goa
Ro Ro ferryboat: 'रो-रो फेरीबोटी'वरुन तापले वातावरण! ग्रामसभा न घेतल्याने संतापाचा सूर; चोडणवासीयांचा गंभीर इशारा

५ रुपयांची वाढ योग्यच

सरकारने तिकीट आकाराविषयीची आधीच अधिसूचना जारी केली आहे. त्याचबरोबर गेल्या चार महिन्यांपासून रो-रो फेरीबोट सुविधा सुरळीतपणे कार्यरत आहे. सुरळीत, सुरक्षित, विमाधारक, जलद, सोयीस्कर, सतत सेवेसाठी असल्याने फक्त ५ रुपयांची वाढ ही योग्य आहे.

काही महिन्यांनी दिवाड मार्गावर रो-रो फेरीबोट सुरू होणार आहे, तेथील शुल्क आकारणीविषयी सरकारच निर्णय घेईल.

राज्यात विविध ठिकाणी फेरीबोट ही महत्त्वाची सेवा बनली आहे. या सेवेतून दरवर्षी ८० कोटींचा तोटा नदी परिवहन खात्याला सहन करावा लागत आहे. त्या तुलनेत मिळणारे उत्पन्न नगण्य आहे, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com