राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत ‘जीएमसी’चे झिबाने, चिनार प्रथम

‘गोवा थ्रू द एज’ (1961-2020)संकल्पनेवरील आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत ‘जीएमसी’चे मास्टर झिबाने पायस आणि मास्टर चिनार खरंगटे यांनी प्रथम पारितोषिक पटकावले.
GMC

GMC

Dainik Gomantak

Bambolim: बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजचे (GMC) मास्टर झिबाने पायस आणि मास्टर चिनार खरंगटे यांनी ‘गोवा थ्रू द एज’ (1961-2020) या संकल्पनेवरील आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले. माहिती आणि प्रसिद्धी खात्याने (Information and Publicity Department) गोवा मुक्तीच्या 60व्या (Goa 60th Liberation Day) वर्षानिमित्त पणजीतील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात ही स्‍पर्धा आयोजित केली होती. यावेळी माहिती अधिकारी प्रकाश नाईक, साहाय्यक माहिती अधिकारी श्याम गावकर आणि क्विझ मास्टर नागेश सरदेसाई यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>GMC</p></div>
...त्यामुळे कामगारवर्गाला वेतन वेळेवर मिळाले नाही: मुरगाव नगराध्यक्ष

प्रकाश नाईक यांनी गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे आयोजित विविध तालुकास्तरीय कार्यक्रमांची माहिती दिली. विद्यार्थी समुदायाला त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ (Platform) उपलब्ध करून देण्यासाठी खात्यातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून राज्यस्तरावर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केल्या जात असून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रश्नमंजुषा स्पर्धेतील द्वितीय विजेत्या मिरामार येथील व्ही.एम.साळगावकर कायदा महाविध्यालय, तृतीय पारितोषिक विजेत्या पणजीतील धेंपे कला व विज्ञान महाविद्यालय आणि सरकारी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साखळी व विद्या प्रबोधिनी महाविद्यालय पर्वरी यांना अनुक्रमे चौथे आणि पाचवे पारितोषिक वितरीत करण्यात आले.

माहिती व प्रसिध्दी खात्यातर्फे रवींद्र भवन साखळी व रवींद्र भवन मडगाव येथे विद्यार्थ्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांनाही यावेळी पारितोषिके वितरीत करण्यात आली. चित्रकला स्पर्धेत गोव्यातील एकूण 356 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. साहाय्यक माहिती अधिकारी श्याम गावकर यांनी आभार मानले. माहिती साहाय्यक रंजना मळीक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com