युनिटी मॉलपाठोपाठ डेल्‍टिन कॅसिनो, गेरा प्रकल्पाला विरोध! सरकारसमोर आव्‍हान; श्रीपाद नाईकांवर चिंबलवासीयांचा प्रश्नांचा भडीमार

Goa News: मॉल प्रकल्‍पाला स्‍थानिकांकडून विरोध सुरू असतानाच रेईश मागूशमधील जनतेनेही मांडवी नदीत येत असलेल्‍या ‘डेल्‍टिन’ कॅसिनोला ग्रामसभेत तीव्र विरोध दर्शवला.
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: चिंबलमधील प्रस्‍तावित युनिटी मॉल प्रकल्‍पाला स्‍थानिकांकडून विरोध सुरू असतानाच रेईश मागूशमधील जनतेनेही मांडवी नदीत येत असलेल्‍या ‘डेल्‍टिन’ कॅसिनोला रविवारच्या ग्रामसभेत तीव्र विरोध दर्शवला. तर, खांडोळ्यातील नागरिकांनी तेथे येऊ घातलेल्‍या ‘गेरा’च्‍या प्रकल्पाला ठाम विरोध दर्शवला.

महसुलाच्‍या दृष्‍टीने महत्त्‍वपूर्ण असलेले नियोजित प्रकल्‍प आणि कॅसिनोवरून आता सरकारसमोरही मोठे आव्‍हान उभे राहिले आहे.

केंद्र सरकारकडून मंजूर झालेला युनिटी मॉल प्रकल्‍प राजधानी पणजीपासून जवळ असलेल्‍या चिंबलमध्‍ये उभारण्‍याचा निर्णय सरकारने घेतलेला होता. त्‍यासाठी सरकारी जमीनही संपादित करण्‍यात आलेली होती. परंतु, या प्रकल्‍पामुळे तोयार तळे उद्धवस्‍त होण्‍याचा धोका वर्तवत स्‍थानिकांनी या प्रकल्‍पाविरोधात शड्डू ठोकला.

प्रकल्‍पाविरोधात त्‍यांचे आंदोलन अजूनही सुरू असून, हा केंद्रीय प्रकल्‍प असल्‍याने आंदोलकांनी रविवारी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन आंदोलन छेडले. अखेर, या प्रकल्‍पासंदर्भात आपण मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍याशी चर्चा केलेली आहे.

स्‍थानिकांना हा प्रकल्‍प नको असेल तर आपण त्‍यावर विचार करणे आवश्‍‍यक असल्‍याचेही आपण त्‍यांना सांगितले असून, मुख्‍यमंत्र्यांनीही त्‍यात रस दाखवलेला आहे, असे त्‍यांनी सांगितले.

चिंबलमधील युनिटी मॉल प्रकल्‍पाचा विषय गाजत असतानाच, मांडवी नदीत डेल्‍टीन कंपनीचे आणखी एक कॅसिनो जहाज येणार असल्‍याचे सरकारने स्‍पष्‍ट केले होते. त्‍यावरून रेईश मागूश पंचायतीच्‍या रविवारच्‍या ग्रामसभेत वादळी चर्चा झाली.

मांडवी नदीतील कॅसिनोंचा अगोदरच पर्यावरणावर परिणाम होत आहे. अशा स्‍थितीत नदीत आणखी कॅसिनो आल्‍यास त्‍याचे दुष्‍परिणाम भविष्‍यात स्‍थानिकांना भोगावे लागतील असे म्‍हणत रेईश मागूशमधील नागरिकांनी ग्रामसभेत नव्‍या कॅसिनोला तीव्र विरोध दर्शवला.

साळगावचे आमदार केदार नाईकही ग्रामसभेला उपस्‍थित होते. स्‍थानिकांच्‍या समस्‍या ऐकून घेत याबाबत मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा करण्‍याची हमी त्‍यांनी दिली.

दरम्‍यान, खांडोळा येथील ‘गेरा’च्‍या मेगा प्रकल्‍पाबाबत स्‍थानिकांनी तीव्र नाराजी व्‍यक्त केली. ‘गेरा’च्या मेगा प्रकल्पामुळे गावातील रस्ते, पाणी, वीज समस्या वाढणार असून, त्‍याचा जैवविधतेला धोका निर्माण होणार आहे. त्‍यामुळे हा प्रकल्‍प खांडोळ्यातून हद्दपार करण्‍यात यावा, अशी मागणी लावून धरीत स्‍थानिकांनी याबाबतचा ठराव संमत करून घेतला.

Goa News
Chimbel: ..अखेर सुरुवात झाली! 'तोयार' सभोवतीच्या जागेचे सर्वेक्षण सुरु; 3 दिवस चालणार काम

डीपीआर का दिला नाही?

युनिटी मॉलविषयी आम्ही मागितलेला डीपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल) सरकार आम्हाला का देत नाही, राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आपण जनतेबरोबर आहोत, हे जाहीर करावे. २९ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आत्तापर्यंत मुख्यमंत्री वगळता राज्य सरकारातील एकही मंत्री आणि भाजपचा कोणताही नेता भेटण्यासाठी आला नाही.

तुम्हीही उत्तर गोव्याचे खासदार असताना तुमचे मतदार म्हणून उपोषणकर्त्यांना भेटायला यायला हवे होते, अशा प्रश्नांचा भडीमार उपस्थित चिंबल ग्रामस्थांनी राज्यमंत्री नाईक यांच्यावर केला.

Goa News
Chimbel: ताठ मानेने लढा कसा चालवावा हे 'चिंबल'ने दाखवून दिलेच आहे; हट्टाग्रह

शुक्रवारी महाआंदोलन

उपोषणकर्ते अजय खोलकर म्हणाले, युनिटी मॉलविषयी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून श्रीपाद नाईक यांना लोकसभेत विषय मांडता येणार नाही. त्यांना संबंधित मंत्र्यांकडेच तो मांडावा लागणार आहे. प्रजासत्ताक दिनीही आंदोलन सुरूच राहील आणि शुक्रवारी महाआंदोलन होईल, असे त्यांनी जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com