Chimbel: चिंबलच्या आंदोलनकर्त्यांवर जमावबंदी का? पाटकर यांचा सवाल; भाजपविरोधात तक्रार न केल्यास घेराव घालण्याचा इशारा

Amit Patkar: दरम्यान, सोमवारपर्यंत भाजपविरोधात पोलिसांत तक्रार न केल्यास उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल, असा इशाराही पाटकर यांनी दिला आहे.
Chimbel Unity Mall | Amit Patkar
Chimbel Unity Mall | Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: चिंबलच्या उपोषणकर्त्यांना पणजीत येऊ नये, म्हणून जमावबंदीचा आदेश लागू केला जातो. परंतु भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आलेले असताना मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते आणि घोषणाबाजी केली जाते, तर त्यामुळे राज्यात भाजपसाठी एक आणि जनतेसाठी दुसरा कायदा आहे काय? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.

दरम्यान, सोमवारपर्यंत भाजपविरोधात पोलिसांत तक्रार न केल्यास उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल, असा इशाराही पाटकर यांनी दिला आहे. या प्रसंगी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर आणि दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सावियो डिसोझा यांची उपस्थिती होती.

दिल्लीत नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेते राहुल गांधी, वेणुगोपाल राव यांची आपल्यासह गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासमवेत भेट घेतली.

Chimbel Unity Mall | Amit Patkar
Chimbel Protest: चिंबलवासीयांचे महाआंदोलन! शेकडो ग्रामस्थ पोचले जुने गोवेत; अधिसूचना येईपर्यंत उपोषणाचा इशारा Video

त्या भेटीत झालेल्या चर्चेची माहिती देताना पाटकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षाने केलेली कामगिरी सुखावह ठरली आहे. त्यामुळे आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याच्या आणि पक्ष संघटन मजबूत करण्याच्या स्पष्ट सूचना नेत्यांनी दिल्या आहेत.

Chimbel Unity Mall | Amit Patkar
Chimbel Unity Mall Controversy: चिंबलचा विजय, सरकारची माघार! 32 दिवसांच्या चिवट लढ्यानंतर 'युनिटी मॉल'चा प्रकल्प रद्द

भाजपसाठी अटी नाहीत!

पाटकर पुढे म्हणाले, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पणजीत आले, त्यांचा स्वागत कार्यक्रम पक्षातर्फे दणदणीत केला जातो. वाहनातून मिरवणूक काढली जाते, घोषणाबाजी केले जाते, फटाक्यांची आतषबाजी केली जाते. परंतु त्याच्याअगोदर चिंबलच्या लोकांना आंदोलन करता येत नाही, त्यांच्यांसाठी जिल्हाधिकारी जमावबंदी आदेश लागू केला जातो, ज्या अटी चिंबलच्या आंदोलनकर्त्यांना घातल्या जातात, त्या भाजपसाठी लागत नाहीत काय? असा सवाल त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com