Chimbel Protest: चिंबलवासीयांचे महाआंदोलन! शेकडो ग्रामस्थ पोचले जुने गोवेत; अधिसूचना येईपर्यंत उपोषणाचा इशारा Video

Chimbel Unity Mall Protest: जुने गोवे येथे युनिटी मॉल प्रकल्पाविरोधात चिंबल गावातील शेकडो ग्रामस्थांनी महाआंदोलन पुकारले असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
Chimbel Maha Andolan
Chimbel Maha AndolanDainik Gomantak
Published on
Updated on

जुने गोवे येथे युनिटी मॉल प्रकल्पाविरोधात चिंबल गावातील शेकडो ग्रामस्थांनी महाआंदोलन पुकारले असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभाबाबत अधिकृत अधिसूचना जारी होईपर्यंत निषेध आंदोलन आणि उपोषण सुरूच ठेवले जाईल.

आंदोलनात स्थानिक रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ग्रामस्थांच्या मते, हा प्रकल्प स्थानिक पर्यावरण, पाण्याचे स्रोत आणि गावाच्या सामाजिक रचनेवर विपरीत परिणाम करणार आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रकल्प तात्काळ थांबवावा अशी त्यांची मागणी आहे.

Chimbel Maha Andolan
Chimbel Unity Mall Controversy: चिंबलचा विजय, सरकारची माघार! 32 दिवसांच्या चिवट लढ्यानंतर 'युनिटी मॉल'चा प्रकल्प रद्द

या आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळत असून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे काही नेते आंदोलनस्थळी उपस्थित राहिले. त्यांनी ग्रामस्थांना पाठिंबा दिला.

Chimbel Maha Andolan
Chimbel Survey: चिंबलमधील 'तोयार'चे सर्वेक्षण पूर्ण! सरकारकडे अहवाल होणार जमा; मुख्‍यमंत्र्यांच्‍या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी मात्र मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com