Kadamba Plateau: कदंब पठारावरील ‘युनिटी मॉल’ला विरोध; चिंबल ग्रामसभेत ठराव मंजूर

Chimbel Panchayat Gram Sabha: पाणथळ घोषित केलेल्या तळ्याच्या शेजारी हा मॉल आल्यास तळ्याला क्षती पोहोचणार असून सरकारने हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली
Chimbel Panchayat Gram Sabha: पाणथळ घोषित केलेल्या तळ्याच्या शेजारी हा मॉल आल्यास तळ्याला क्षती पोहोचणार असून सरकारने हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली
Chimbel Gram Sabha |Kadamba Plateau MallDainik Gomantak
Published on
Updated on

तिसवाडी: कदंब पठारावरील प्रस्तावित युनिटी मॉल बांधण्यास चिंबल ग्रामसभेत विरोध करण्यास आला. पाणथळ म्हणून घोषित केलेल्या तळ्याच्या शेजारी हा मॉल आल्यास तळ्याला क्षती पोहोचणार असून सरकारने हा प्रकल्प त्वरित रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. या प्रकल्पा विरोधात ठराव मांडून एकमताने संमत करण्यात आला.

प्रथम आयटी पार्क आणण्याच्या दृष्टिकोनातून ही जमीन काबीज करण्याचा नियोजन केले गेले होते, परंतु आम्ही याला विरोध केल्यानंतर प्रकल्प रद्द झाला. आता मॉल आणून सभोवतीची जमीन हडपण्याचा कट आहे. सुमारे ४.५० लाख चौ. मी. जमिनीपैकी १.८० लाख चौ. मी. जमीन पाणथळाच्या अखत्यारित आणण्यास यश मिळाले. जर हा मॉल आला तर पर्यावरण नष्ट होईल व याचे गंभीर परिणाम जलस्रोतांवर होणार आहेत, असे मत ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले.

या विषय चर्चेस आल्यानंतर सरपंच संदेश शिरोडकर यांनी या मॉल संदर्भात मंजुरीसाठी कोणताही दस्तावेज न आल्याची माहिती दिली. प्रकल्पाच्या विरोधात पंचायतीच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीचे गोविंद शिरोडकर यांनी हा विषय मांडून पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्यावर हल्लाबोल केला. आयटी पार्कच्या वेळी देखील हेच मंत्री होते. आम्ही सांताक्रूझचे आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांना सूचना दिली असून आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे, असे शिरोडकर म्हणाले.

Chimbel Panchayat Gram Sabha: पाणथळ घोषित केलेल्या तळ्याच्या शेजारी हा मॉल आल्यास तळ्याला क्षती पोहोचणार असून सरकारने हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली
Kadamba Plateau: कदंब पठारावरील प्रकल्पास तीव्र विरोध; जैवविविधता पार्कची मागणी

स्मशानभूमीवरून ग्रामस्थ आक्रमक

ग्रामसभेत स्मशानभूमीचा विषय पुन्हा एकदा चर्चेस आल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित असून स्मशानभूमीत जाणारी वाट अडवली गेली आहे. संबंधित बिल्डरला दिलेला परवाना त्वरित रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिरोडकर यांनी या तक्रारीची दखल घेऊन या भागाचे निरीक्षण करणार असल्याचे उत्तर दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com