Kadamba Plateau: कदंब पठारावरील प्रकल्पास तीव्र विरोध; जैवविविधता पार्कची मागणी

Local and Biodiversity Management Committee: सरकारने बळजबरी करून प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास मेळावलीसारखे आंदोलन करणार असल्याचा इशारा
Local and Biodiversity Management Committee: सरकारने बळजबरी करून प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास मेळावलीसारखे आंदोलन करणार असल्याचा इशारा
Local and Biodiversity Management Committee Chimbel PanchayatDainik Gomantak
Published on
Updated on

तिसवाडी: कदंब पठारावरील चिंबल पंचायतीच्या अखत्यारीत येणाऱ्या जमिनीत पर्यटन खात्यामार्फत येणाऱ्या प्रकल्पाला स्थानिक आणि जैवविविधता व्यवस्थापन समितीने तीव्र विरोध केला आहे. सरकारने बळजबरी करून प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास मेळावलीसारखे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. कदंब पठारावर स्थानिक आणि जैवविविधता व्यवस्थापन समिती सदस्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा विरोध दर्शविला.

याच ठिकाणी पूर्वी आयटी पार्क लादण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा चिंबलवासीयांनी तीव्र विरोध केल्यानंतर प्रकल्प झाला नाही. आत्ता पर्यटन खात्यामार्फत मॉल बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी काम सुरू करून सुमारे ४०० वृक्ष तोडण्यात आले आहेत. हा भाग पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असून गावातील गरीब लोक येथे शेती करतात.

सामान्य माणसाला मुळासकट संपवण्याचा कट सरकारकडून रचला गेला आहे. त्यासाठी पर्यावरण आणि लोकविरोधी प्रकल्प आणले जात आहेत. सरकारने हा प्रकल्प त्वरित थांबवला नाही, तर आंदोलन करण्याखेरीज दुसरा पर्याय राहणार नाही, असे यावेळी जैवविविधता व्यवस्थापन समितीचे सदस्य गोविंद शिरोडकर यांनी सांगितले.

जैवविविधता पार्क उभारावा

पर्यटन खात्याच्या नियोजित प्रकल्पासाठीचा हा परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असून तो वन क्षेत्रात येतो, परंतु येथे बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी वृक्षतोड करून नंतर जमिनी विक्रीचा मार्ग मोकळा करण्यासाठी ही युक्ती आहे. सरकारला येथे काही करायचा असेल, तर जैवविविधता पार्क उभारावा अशी आमची मागणी आहे. जैवविविधता पार्क आल्यास पर्यावरणाला त्याचा लाभ होणार आहे. वैयक्तिकरीत्या कोणाला लाभ होणार नाही, परंतु पर्यावरण टिकून ठेवल्यास पुढच्या पिढीला आम्ही पर्यावरण राखून ठेवू शकू, असे मत सदस्यांनी व्यक्त केले.

Local and Biodiversity Management Committee: सरकारने बळजबरी करून प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास मेळावलीसारखे आंदोलन करणार असल्याचा इशारा
Film City Project : भगवती पठारावर कोणताच प्रकल्प नको; फिल्म सिटीला विरोध

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालून स्थानिकांना डावलून हा प्रकल्प लादू नये. हा प्रकल्प त्वरित रद्द करून आमची मागणी पूर्ण करावी, असे सदस्य म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com