Madkai Molestation Case: मडकई विद्यार्थिनी विनयभंग प्रकरण; 'त्या' पीई शिक्षकाला अटक पूर्व जामीन मंजूर

म्हार्दोळ पोलिसांनी या शिक्षकाविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवला होता
Court
Court Dainik Gomantak

Child Court Grants Anticipatory Bail To PE Teacher In Allegedly Sexually Molesting Case: मडकईतील विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी पीई शिक्षकाला अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आला. पणजीतील बाल न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता त्यावर आज सुनावणी झाली.

मडकईतील एका विद्यालयातील विद्यार्थिनीचा पीई शिक्षकाने विनयभंग केल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी म्हार्दोळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार म्हार्दोळ पोलिसांनी या शिक्षकाविरुद्ध गुन्हाही नोंदवला होता.

Court
Canacona: मित्राला सोडण्यासाठी गेला पण परत आलाच नाही; काणकोण येथे 20 वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू

गोवा स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने म्हार्दोळ पोलिसांना पत्र लिहील्यानंतर पीई शिक्षकासोबत इतिहासाचे शिक्षक व मुख्याध्यापकाचे नाव तक्रारीत दाखल करण्यात आले होते.

पीडित मुलीने विनयभंगाची घटना प्रथम इतिहासाच्या शिक्षकाला आणि नंतर मुख्याध्यापकांना सांगितली. परंतु त्यांनी जवळपास 5 महिने पोलिसांना माहिती दिली नाही, अशा प्रकारे पोक्सो कायद्याच्या कलम 19 चे उल्लंघन केले. त्या आधारे म्हार्दोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

यानंतर याप्रकरणी शारीरिक शिक्षक, इतिहासाचा शिक्षिक तसेच मुख्याध्यापकाने जामिनासाठी पणजीतील बाल न्यायालयात अर्ज दाखल केला. दरम्यान न्यायालयाने पीई शिक्षकाला अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com