Children Park : बालोद्यानांतील ‘किलबिलाट’ थंडावत चाललाय; पावसामुळे मुलांनी फिरवली पाठ

Children Park : त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून गजबजणाऱ्या शहरातील प्रमुख बालोद्यानांत आता कमालीची शांतता दिसून येत आहे.
Children Park
Children Park Dainik Gomantak

Children Park :

डिचोली, अवकाळी पावसामुळे सध्या डिचोलीतील बालोद्यानांकडे (चिल्ड्रन पार्क) मुलांनी पाठ फिरवली आहे. काही बालोद्याने बंदही करण्यात आली आहेत.

त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून गजबजणाऱ्या शहरातील प्रमुख बालोद्यानांत आता कमालीची शांतता दिसून येत आहे.

मोसमी पावसाळा आणि नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात होण्यास आता अवघेच दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत पुढील किमान चार ते पाच महिने बालोद्याने आता ओस पडणार आहेत. डिचोली शहरात हाऊसिंग बोर्ड, नाईकनगर, पालिका इमारतीजवळ आणि लामगाव भागात बालोद्याने आहेत.

शाळांना उन्हाळी सुट्टी पडली की खेळण्या-बागडण्याचे ठिकाण असणारी बालोद्याने लहान मुलांना खुणावू लागतात.

Children Park
Goa Murder Case: वास्कोत घरगुती वादातून पत्नीचा खून, पती पोलिस स्थानकात हजर

पाऊस सुरु होईपर्यंत ती गजबजून जातात. यंदा शाळांना सुट्टी पडल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील सर्व बालोद्यानांमधून रोज सकाळ-संध्याकाळी लहान मुलांचा गजबजाट आणि किलबिलाट दिसून येत होता. मुलांसह त्यांचे पालकही बालोद्यानात दिसून येत होते. मात्र अवकाळी पावसाने कहर सुरू केल्यानंतर आता मुलांसह त्यांच्या पालकांनीही बालोद्यानांकडे पाठ केली आहे.

पाणी साचून बहुतांश भाग बनतो निसरडा

पावसामुळे बालोद्यानांमध्ये पाणी साचते व बहुतांश भाग निसरडा बनतो. अशा स्थितीत खेळणे-बागडणे धोक्याचे असते. त्यामुळे बालोद्याने बंद ठेवण्यात येतात. लहान मुलांसाठी वरदान ठरलेले बोर्डे येथील गृहनिर्माण वसाहतीतील ‘चिल्ड्रन पार्क’ हे शहरातील एक प्रमुख बालोद्यान आहे. मात्र सध्या या बालोद्यानाच्या फाटकाला टाळे ठोकण्यात आले आहे.

त्यामुळे तेथे कमालीची शांतता दिसून येत आहे. गेल्या वर्षी पावसाळ्‍यात या बालोद्यानाट खेळताना घसरून पडल्याने एक मुलगा जखमी झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती होता कामा नये म्‍हणून खबरदारी घेतली जात असून अवकाळी पाऊस पडताच बालोद्यान बंद करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com