Rottweiler Dog Attack: कुत्र्याच्या हल्ल्यात मुले रक्तबंबाळ

ताळगाव येथील घटना: बालहक्क आयोगाने घेतली दखल
Rottweiler Dog Attack:
Rottweiler Dog Attack:Dainik Gomantak
Published on
Updated on

Rottweiler Dog Attack: ओयतियांत - ताळगाव येथे रॉटवेलर जातीच्या कुत्र्याने दोन अल्पवयीन मुलांवर हल्ला केला. त्यात दोन्ही मुले रक्तबंबाळ झाली. कुत्र्याने जखमी केल्याप्रकरणी कुत्र्याच्या मालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यास मुलांच्या पालकांना विनंती केली, तरी ते राजी झाले नाहीत.

Rottweiler Dog Attack:
MLA Subhash Phaldesai सुभाष फळदेसाईंवर शुभेच्‍छांचा वर्षाव; मुख्‍यमंत्र्यांकडून स्‍तुतिसुमने

कुत्र्याच्या मालकाने मुलांच्या उपचारावरील खर्च उचलल्याने पालक समाधानी असले, तरी पणजी पोलिस या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या विचारात आहेत. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानेही पोलिसांना पत्र पाठवून या घटनेचा तपास करून तीन दिवसांत त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

दोन अल्पवयीन मुले काल संध्याकाळी ७ च्या सुमारास आईसोबत रस्त्याने फिरण्यास जात असताना बंगल्याच्या कंपाऊंडवरून उडी मारून रॉटवेलर कुत्र्याने या मुलांवर हल्ला केला. मुलांच्या मानेचा व डोक्याचा चावा घेतल्याने खोलवर जखमा झाल्या.

कुत्र्याच्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्या पाच व सात वर्षाच्या मुलांवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

या कुत्र्याच्या हल्‍ल्यामुळे मुलांच्या शरीरावर विविध ठिकाणी जखमा झाल्या. या दोघांना गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले, मात्र त्यांच्यावर उपचार करण्यामध्येही काहीसा हलगर्जीपणा झाला. उपचार सुरू करण्यास डॉक्टरांनी एक तास उशीर केला.

या घटनेची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी गोमेकॉ इस्पितळात जाऊन मुलांच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांना कुत्र्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यासाठी तक्रार द्या, अशी विनंती केली. मात्र त्यांनी नकार दिला. कुत्र्याच्या मालकाने या मुलांवरील उपचाराचा खर्च उचलण्याची हमी दिली आहे. त्यामुळे तक्रार दिली, तर उपचाराचा खर्च कोण करणार? याची अगोदर माहिती द्या, असे सांगितले. पालक असताना पोलिस स्वेच्छा तक्रार दाखल करू शकत नाहीत, तरीही पोलिसांनी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांनी दिली.

याप्रकरणाची माहिती मिळताच राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष बोर्जीस यांनीही गोमेकॉ इस्पितळात जाऊन दोन्ही मुलांची पाहणी केली.

कुत्र्याच्या मालकाविरुद्ध कारवाई करा, तसेच या तपासकामाचा अहवाल तीन दिवसात द्या, असे पत्रात नमूद केले आहे. बोर्जीस यांनी पालकांना कुत्र्याच्या मालकाविरुद्ध तक्रार देण्याची विनंती केली, मात्र पालकांनी मुलांच्या उपचारावरील खर्च कोण उचलणार, ते आधी सांगा, असे विचारल्यावर ते गप्पच राहिले.

आई बेशुद्ध पडली!

कुत्र्याने हल्ला करताच मुलांची आई हा प्रकार पाहून तेथेच बेशुद्ध पडली. तोपर्यंत कुत्र्याचा मालक तेथे आला. जखमी मुलांना रुग्णवाहिकेने गोमेकॉ इस्पितळात दाखल केले. एवढे होऊनही काल रात्री उशिरापर्यंत कोणावरच गुन्हा दाखल झाला नव्हता.

Rottweiler Dog Attack:
Goa News: गोवा मुक्तिपासून रखडलेला मोर्ले-बागवाडा पूल लवकरच मार्गी लागणार

कुत्र्याच्या मालकाने मुलांवरील उपचाराचा खर्च उचलण्याची हमी दिली आहे. हल्ल्यानंतर ही मुले खूपच भेदरली आहेत. त्या जखमा बऱ्या होण्यास काही महिने लागतील.

पोलिस गुन्हा नोंदवण्याच्या विचारात

रॉटवेलर कुत्रा हा वेगळ्या जातीचा असून त्याचा हल्ला भयानक असतो. त्याने बंगल्याच्या कंपाऊंडवरून उडी घेऊन पसार झाला. त्याचे देहयष्टी मजबूत असल्याने तो नियंत्रणात येणे कठीण असते. तो मालकाचाच आदेश ऐकतो. त्यामुळे तो हल्ला करत असताना बंगल्यातील कामगारांनी त्याला ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न कमी पडत होते. हा प्रकार भयानक होता, असे प्रत्यक्षदर्शी ही घटना पाहिलेल्यांचे मत होते. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे मुलांच्या किंकाळ्या तसेच तेथे झालेल्या धावपळीमुळे एकच गोंधळ उडाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com