Casaulim Teen Drowned: कासावली चिरे खाणीत बुडून मृत्यूप्रकरणी बाल अधिकार आयोगाकडून स्‍वेच्‍छा दखल

जिल्हा प्रशासनाकडून अपघातस्थळाची पाहणी
Deaths by Drowning in Goa
Deaths by Drowning in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Casaulim Teen Drowned: कासावली येथील वापरात नसलेल्‍या चिर्‍याच्‍या खाणीत भरलेल्‍या पाण्‍यात 14 वर्षाच्‍या अनिल चव्‍हाण या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची गोवा राज्‍य बाल अधिकार आयोगाने स्‍वेच्‍छा दखल घेतली असून या अपघातस्‍थळाची जिल्‍हा प्रशासनाने पाहाणी केली.

यावेळी येथे सुरक्षेचे काय उपाय करता येतील, याबाबत पाहणी करावी, असा आदेश आयोगाचे अध्‍यक्ष पीटर बॉर्जिस यांनी दिले आहेत.

Deaths by Drowning in Goa
Goa Government with Paytm: राज्य सरकारचा 'पेटीएम'शी करार; सरकारी कार्यालये कॅशलेस करण्याच्या दिशेने पाऊल

त्यानुसार उद्या 14 जुलै रोजी मुरगावचे उपजिल्‍हाधिकारी, वेर्णा पोलीस आणि कासावली पंचायतीचे सचिव यांच्‍यातर्फे या जागेची संयुक्‍त पाहणी करण्‍यात येणार आहे. अशा कुंपण नसलेले खाणी आणि खंदक पावसात नागरिकांना तसेच विशेष करुन लहान मुलांना धोकादायक असतात.

या ठिकाणी सुरक्षेचे उपाय योजून या दुर्घटना थांबविता येतील का, याची पाहाणी करावी, असे बार्जिस यांनी आपल्‍या आदेशात म्‍हटले आहे.

अशा खाणींमध्‍ये कित्‍येक अल्‍पवयीन मुले पोहण्‍यास येतात. त्‍यातून या दुर्घटना होतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. 11 जुलै रोजी ही दुर्घटना घडली होती. या उघड्यावर टाकून दिलेल्या खाणीच्या डोहात हा मुलगा पोहायला गेला असता त्याला बुडून मृत्यू आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Supreme Court Notice to ECI
High Court PIL Mala Lake dead fish
Casaulim Cuelim Accident Death
Tourism Department Goa Update
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com