Goa Government with Paytm
Goa Government with PaytmDainik Gomantak

Goa Government with Paytm: राज्य सरकारचा 'पेटीएम'शी करार; सरकारी कार्यालये कॅशलेस करण्याच्या दिशेने पाऊल

गोवा सरकारकडून 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
Published on

Goa Government Signs MoU with Paytm: गोवा सरकारने सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) अधिक बळकटी देणारी आणि गोवावासीयांसाठी डिजीटल गव्हर्नन्स चालविणारी दोन आश्वासने पूर्ण केली आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही आश्वासने देण्यात आली होती. आणखी 2 अर्थसंकल्पीय आश्वासने पूर्ण केली.

Goa Government with Paytm
Siolim Hotel Shootout: शिवोली हॉटेलमध्ये गोळीबार प्रकरणी तिन्ही संशयितांना 5 दिवस पोलिस कोठडी

दरम्यान, गोवा सरकारने आज, गुरूवारी 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. यातील एक करार पेटीएम शी करण्यात आला आहे. यात ईडीसी, एसबी आणि क्यूआर कोड अशी उपकरणे तैनात करून आणि विविध विभागांना पेटीएम अॅप वापरास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यातून सर्व विभाग डिजिटल होण्यासाठी मदत होईल.

दरम्यान, सूक्ष्म आणि लघु उद्योगांना गोवा क्रेडिट हमी योजना / मुख्यमंत्री सरल उद्योग सहाय्य योजना अशा पत हमी योजनांच्या अंमलबजावणीसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टची मदत घेतली जाणार आहे. त्यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे.

क्षमता उंचावण्यासाठी, संशोधनासाठी, धोरण तयार करण्यात मदतीसाठी, सल्लामसलत आणि इतर उपक्रमांमध्ये सहकार्य आणि सहयोग विकसित करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सची मदत घेतली जाणार आहे. यांच्या सोबतही सामंजस्य करार करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com