
वास्को: चिखली येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या रानी बिंद (३५) या महिलेचा रविवारी गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू झाला.
२३ मे रोजी रात्री पावणेआठच्या चिखली येथील एसएमआरसी इस्पितळाकडील अंतर्गत रस्त्याच्या बाजूने आपल्या कुत्र्याला घेऊन जाणाऱ्या रानी बिंद यांना उल्हास नाईक या कारचालकाने जोरदार धडक दिली होती.
या अपघातात कुत्रा जागीच ठार झाला तर रानी बिंद या गंभीर जखमी झाल्या होत्या. या अपघातात त्या कारचेही नुकसान झाले. वास्को पोलिसांनी पंचनामा करून कारचालकाविरोधात गुन्हा नोंद केला होता.
दरम्यान, या अपघातप्रकरणी चौकशी व पंचनामा करणारे हवालदार दामोदर मयेकर यांनी हे प्रकरण योग्यरीत्या हाताळले नसल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो व रानी बिंद यांच्या नातेवाइकांनी केला होता. त्यांनी दोन वेळा वास्को पोलिस स्थानकाला भेटी देऊन विचारणा केली होती. रानी बिंद यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर कुतिन्हो पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्याकडे संपर्क साधला असता चौकशी अधिकारी बदलल्याचे कदम यांनी सांगितल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले.
वेर्णा येथे शनिवारी (ता३१) कारने ठोकरल्याने जखमी झालेल्या अक्षता नाईक हिची प्रकृती सुधारत असल्याचे वेर्णा पोलिसांनी सांगितले. या अपघातात केपे येथील अनिषा बोरकर हीचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातप्रकरणी वेर्णा पोलिसांनी आगशी येथील जोनाथन परेरा (१९) याच्याविरोधात गुन्हा नोंद केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.