'Dabolim' प्राधिकरणावर कारवाई करा; मलनिस्सारणावरुन चिखली ग्रामस्थ संतप्त

चिखली पंचायतीने केली संयुक्त पाहणी
Dabolim
DabolimDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: दाबोळी विमानतळ प्राधिकरण आपले मलनिस्सारण आसई डोंगरी येथील नैसर्गिक झरीत सोडत असल्याचा आरोप चिखली पंचायतीने केला आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण बोर्ड, आरोग्य खाते व चिखली पंचायतीने आज संयुक्त पाहणी करून यावर विचार विनिमय करण्यात आला.विमानतळ प्राधिकरणाच्या या हलगर्जीपणावर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

(Chikhli villagers demand over the sewage disposal take action against Dabolim airport authority)

Dabolim
53rdEditionOfIffiGoa: जगभरातील सिनेरसिकांचे लक्ष लागलेल्या IFFI साठी गोवा सज्ज

दाबोळी विमानतळ प्राधिकरण आपली मलनिस्सरण घाण आसई डोंगरी येथील नैसर्गिक झरीत सोडत असल्याची तक्रार चिखली ग्रामस्थांनी पंचायतीला केली होती. या तक्रारीला अनुसरून चिखली पंचायतीने आज गोवा प्रदूषण नियंत्रण बोर्ड, आरोग्य खाते, विमानतळ प्राधिकरणाबरोबर संयुक्त पाहणी केली असता, दाबोळी विमानतळ प्राधिकरच्या हलगर्जीपणाचा पर्दाफाश झाला.

Dabolim
Dangerous Road in Goa : उसगावचा चौपदरी पूल अंधारात; अपघाताचा धोका वाढला

पाहणी दरम्यान विमानतळ प्राधिकरणाच्या मलनिस्सरणाची घाण येथील नैसर्गिक झरीत सोडल्याचे पाहणी दरम्यान आढळून आले. आसई डोंगरी येथील नागरिकांची पुर्वीपासून तक्रार होती. या घाणीच्या वासामुळे येथील नागरीक हैराण झाले आहेत.

दोन वेळचा घास तोंडात घालणे त्यांना जड झाले आहे. दरम्यान आजच्या संयुक्त पाहणी दरम्यान चिखलीचे सरपंच कमला प्रसाद यादव, सचिव अम्रीत साखळकर, गोवा प्रदूषण नियंत्रण बोर्ड, आरोग्य खाते तसेच दाबोळी विमानतळ प्राधिकरण अधिकायांच्या उपस्थितीत पाहणी केली.

चिखली पंचायतीचे सरपंच कमला प्रसाद यादव यांने प्राधिकरणाच्या या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या तक्रारीला अनुसरून आज संयुक्त पाहणी केली असता विमानतळ प्राधिकरण आपली घाण या नैसर्गिक झरीत सोडत असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वीही असाच प्रकार चालू होता.

यापुढे असा प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशारा सरपंच यादव यांनी दिला आहे. तसेच यावर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी यादव याने केली आहे. दाबोळी विमानतळ प्राधिकरण नैसर्गिक झरीत घाण सोडात असल्याने याचा घाण वास आम्हाला सोसावा लागतो. यावर उपाय योजना आखण्यात आली नाही तर आम्ही स्वत:हून ही घाण वाट बंद करण्याचा इशारा येथील नागरीकांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com