गोव्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे कोल्हापूरच्या अंबाबाईकडे साकडं

मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेतले. गोव्याची निवडणूक जिंकण्यासाठी ते मैदानात उतरले आहेत. त्यापूर्वी त्यांनी प्रचाराचा शुभारंभ देवीचे दर्शन घेऊन केला आहे.
Goa Assembly Elections 2022

Goa Assembly Elections 2022

Dainik Gomantak

Published on
Updated on

Goa Assembly Elections 2022: गोवा विधानसभा निवडणुकीचे वारे आता सर्वत्र वाहू लागले आहे. गोव्यातील राजकीय वर्तुळात दिवसेंदिवस अनेक बदल आणि घडामोडी होताना दिसत आहेत. आपलाच मुख्यमंत्री होणार असा प्रत्येक पक्षाला विश्वास आहे. गोव्याची विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022) जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आमचेच सरकार येणार असा दाव करत प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीदेखील (CM Pramod Sawant) आता प्रचाराचा नारळ फोडला आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Assembly Elections 2022</p></div>
प्रवीण आर्लेकर यांचा भाजप प्रवेश निश्चित

नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यानी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, 'मी दरवर्षीच अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला येत असतो, पण मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. गोव्याच्या समृद्धीसाठी, विकासासाठी मी देवीकडे प्रार्थना करतो.'

<div class="paragraphs"><p>Goa Assembly Elections 2022</p></div>
आमदार विनोद पालयेकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेतले. गोव्याची निवडणूक जिंकण्यासाठी ते मैदानात उतरले आहेत. त्यापूर्वी त्यांनी प्रचाराचा शुभारंभ देवीचे दर्शन घेऊन केला आहे. तसेच त्यांनी जनतेला नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे व आरोग्यदायी जावो असे म्हणत सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Waste Segregation Training For Students
Food Court In Darkness
TCP Act Section 39A Goa
Double Engine Government Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com