CM Pramod Sawant Birthday
CM Pramod Sawant BirthdayDainik Gomantak

CM Pramod Sawant Birthday: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतले लईराई देवीचे आशीर्वाद

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी श्री लईराई देवीचे दर्शन घेवून देवीचे आशीर्वाद घेतले.
Published on

CM Pramod Sawant Birthday: देश-विदेशात नावलौकिक प्राप्त झालेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी (ता.24) सकाळी पत्नी आणि अन्य मान्यवरांसह शिरगावात भेट दिली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी श्री लईराई देवीचे दर्शन घेवून देवीचे आशीर्वाद घेतले.

CM Pramod Sawant Birthday
CM Pramod Sawant Birthday: मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस ठरणार आकर्षणाचा केंद्रबिंदू! असे असतील दिवसभरातील कार्यक्रम

यावेळी त्यांच्यासमवेत मच्छीमार खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर आदिंनी देवीचे दर्शन घेतले.

दरम्यान, श्री लईराई देवस्थानच्या कार्यालयात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मान्यवरांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त पर्वरी येथील विशेष मुलांच्या शाळेतील म्हणजेच संजय शाळेचे विशेष विद्यार्थी मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी 50 फुलांचा पुष्पगुच्छ तयार करण्याचे काम करत आहेत.

या शाळेलाही मुख्यमंत्री भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाचे सर्व मंत्री आणि आमदारही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com