CM Pramod Sawant : कळंगुट प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

'गोमन्तक'च्या भूमिकेचे स्वागत
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant : कळंगुट परिसरात काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड-पाकिस्तान क्रिकेट मॅचच्या दरम्यान पाकिस्तानला समर्थन केल्याच्या कारणास्तव बहुसंख्य लोकांनी संबंधित व्यक्तीला दमदाटी करत गुडघ्यावर बसून ‘भारतमाता की जय’ म्हणायला लावत माफी मागण्यास भाग पाडले होते. या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

कट्टर राष्ट्रवादाचे ओंगळवाणे प्रदर्शन करणारी आणि अल्पसंख्याक व्यक्तीला दमदाटी करून माफी मागायला लावणारी ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. संबंधित प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंतही पोहोचले.

CM Pramod Sawant
Vasco Accident Case: वास्कोत कारखाली झोपणं बेतलं जीवावर! चालकाने 100 मीटर फरफटत नेलं, स्थानिकांनी थांबवलं, पण तोवर...

त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीचा जबाब नोंदवला आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. या घटनेनंतर प्रागतिक विचारांच्या कार्यकर्त्यांनी संबंधितांवर टीकेची जोड उठवली होती. राज्यात कट्टर राष्ट्रवादापेक्षा माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या घटना अपेक्षित होत्या; परंतु वेगळेच घडत आहे.

CM Pramod Sawant
Mapusa Crime News: अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाप्रकरणी एकाला अटक, म्हापसा पोलिसांची कारवाई

'गोमन्तक'च्या भूमिकेचे स्वागत

राष्ट्रवादाच्या नावाखाली काहीजणांना गुडघे टेकून माफी मागायला लावण्याच्या प्रकाराची दखल आज प्रागतिक विचारवंतांनी घेतली. या प्रकारावर ‘गोमन्तक’ने खंबीर भूमिका घेतल्याबद्दल विविध स्तरांतून ‘गोमन्तक’चे अभिनंदन करताना अशा प्रवृत्तींना आताच ठेचून काढले पाहिजे, असे मतही व्यक्त केले.

माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर यांनी ‘गोमन्तक’ने कणखर भूमिका घेतल्याबद्दल अभिनंदन करताना अशा अनिष्ट प्रथा बंद करून गोव्याला वाचवा, असे सरकारला आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com