Verna to Mormugao NH: कामकाजाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

लवकर हा प्रश्न मार्गी लावणार - मुख्यमंत्री
 Verna news
Verna news Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वेर्णा ते मुरगाव बंदरापर्यंत होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा एक रॅम्प (उतार) वास्को शहरात आणण्यासाठी दोन पर्याय सध्या योजले आहे. यात वास्कोवासीयांना कोणता उतार सोयीस्कर असेल, यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल. नंतर कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

(Chief Minister Pramod Sawant inspected the Verna to Mormugao National Highway work)

 Verna news
Jit Arolkar: मातीच्या गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांना प्रोत्साहन देणार

वेर्णा ते मुरगाव सडापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले असून आता महामार्गाचे काम मुरगाव बंदर व वास्को शहरात एक रॅम्प आणण्याच्या हालचाली सुरु असून या प्रकल्पाला विरोध होत आहे. रस्त्याची सध्याची रुंदी अंदाजे 18 मीटर आहे, जी 10 ते 11 मीटर इतकी कमी केली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार आहे.

आयओसी टर्मिनल, पोलिस स्थानक, हॉटेल्स, मॉल, वास्को मशीद आणि भाजी मार्केट या रॅम्पमुळे यांच्यावर परिणाम होणार आहे. मुरगाववासीयांना त्याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. याचा विचार करत आज दि.26 रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याची कामकाजाची पाहणी केली.

 Verna news
Goa Corona Update: दोन दिवसांत दोन कोरोना रूग्णांचा मृत्यू, आज 127 रूग्णांची नोंद

यावेळी मुख्यमंत्र्यांनी वास्कोतील अवजड वाहनासाठी ये-जा करणाऱ्या एफ एल गोम्स रस्त्याची पाहणी केली. नंतर रॅम्प (उतार ) कश्या प्रकारे वास्को शहरात आणावा याविषयी हिंदुस्थान पेट्रोलियम आस्थापना येथे सविस्तर बैठक घेतली.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सविस्तर रॅम्प विषयी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते संजय रेडकर यांनी शहरात रॅम आला तर वाहतूक रहदारीला तसेच लोकांना कोणत्या प्रकारे त्रास होणार याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

या व्यतिरिक्त आणखी दोन पर्याय मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिले. रेडकर यांच्या पर्यायांना उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी दुजेरा दिला. उपाधीक्षक आंगले यांनी शहरातील एफ एल गोम्स रोडवर रॅम्प आल्यास वाहतूक रहदारीला कोणत्या प्रकारे त्रास होणार, तसेच वाहतूक रहदारी वळवल्यास अवजड वाहनांची इतर रस्त्यावर कशाप्रकारे रहदारीला त्रासदायक ठरेल याविषयी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. अशा प्रकारे दोन्हीकडून सविस्तर माहिती ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुढील दोन पर्यायाविषयी संबंधित अधिकाऱ्यांना पाहणी करून पुढील निर्णय घेऊ असे निरीक्षण नोंदवले.

या कामकाचा आयओसी टर्मिनल, पोलिस स्थानक, हॉटेल्स, मॉल, वास्को मशीद आणि भाजी मार्केट यांच्यावर या रॅम्पमुळे परिणाम होणार आहे. मुरगाववासीयांना त्याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, यांच्यासह वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, कुठ्ठाळीचे आमदार आतोन वास, दक्षिण गोवा वाहतूक पोलीस उपाधीक्षक धर्मेश आंगले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विन्सन डिसोजा, मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रीक्स आदि मान्यवरांनी यावेळी उपस्थितीत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com