CM Pramod Sawant: मच्छीमारांनी नवतंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक

नव तंत्रज्ञानामूळे देशाच्या अन् राज्याच्या ब्लू इकॉनॉमीला चालना मिळेल
Goans fishing business
Goans fishing business Dainik Gomantak
Published on
Updated on

मच्छीमार बांधवांनी आपला व्यवसाय अधिक वृद्धींगत करण्यासाठी मासेमारीसाठीचे नवनवे तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. कारण यातच मच्छीमार बांधवांचे सोबत राज्याच्या अन् देशाच्या ब्लू इकॉनॉमीला चालना मिळू शकणार आहे. असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी पणजी येथील एका जेटीवर बसण्यात आलेल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या फिशिंग ट्रॉलरचे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते.

(Chief Minister Pramod Sawant has appealed to Goans fishing business to get advanced technology )

Goans fishing business
खाण कामगारांच्या खुनाची गोवा खंडपीठाकडून दखल

शाश्वत मासेमारी, सागरी आरोग्य, वन्यजीव आणि प्रदूषण यांना बाधा पोहोचणार नाही अशा प्रकारे मासेमारी व्यवसाय केला जाऊ शकतो. याचा फायदा शाश्वतरित्या सर्वांनाच होईल. गोवावासीय अनेक दशकांपासून पारंपारिक मासेमारी व्यवसायात आहेत. त्यामूळे त्यांना त्यांच्या व्यवसायात प्रगत तंत्रज्ञान मिळणे आवश्यक आहे. ज्याचा फायदा त्यांना तसेच राज्याला होईल. असे ही मुख्यमंत्री म्हणाले.

Goans fishing business
Mandrem panchayat: मांद्रे पंचायतीत अविश्वास ठरावाचे प्रकरण थांबेना

मुख्यमंत्र्यांनी पणजी येथील धोंड कुटुंबीयांनी जेटीवर आणलेल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या फिशिंग ट्रॉलरचे उद्घाटन केल्यानंतर या तंत्रज्ञानाची मीहिती घेतली. यावेळी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक राज्यमंत्री श्रीपाद नाईक, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, आमदार राजेश फळदेसाई आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com