Goa Political News: विकासकामांचे रिपोर्ट कार्ड द्या!

Goa Political News: मुख्यमंत्री : दक्षिण गोव्यात काँग्रेसला थेट आव्हान
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Political News: लोकसभा निवडणूक अद्याप जाहीर व्हायची आहे. मात्र, भाजपने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी केली आहे. आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते दक्षिण गोवा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयाचे उदघाटन झाले.

यावेळी कॉंग्रेसने खास करून दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी गेल्या पाच वर्षांचे विकासकामांचे रिपोर्ट कार्ड लोकांसमोर ठेवावे, असे आव्हान मुख्यमंत्री सावंत यांनी आज दिले.

याप्रसंगी भाजप गोवा प्रभारी आशिष सूद म्हणाले की, भारताचे नेतृत्व जगातील इतर देशांनी मान्य केले आहे. भारताचे नेतृत्व इतर देशही स्वीकारत आहेत.

यावेळी दक्षिण गोव्यात भाजपचाच उमेदवार जिंकणार, असा विश्र्वास प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला.

CM Pramod Sawant
Goa Crime News: मोर्लेत साडेचार वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून ठार मारण्याचा प्रयत्न!

यावेळी आमदार दिगंबर कामत, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, सरचिटणीस दामू नाईक, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनीही विचार व्यक्त केले.

निवडणूक कार्यालय उदघाटन सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री आलेक्स सिक्वेरा, क्रीडा मंत्री गोविंद गावडे, माजी खासदार विनय तेंडुलकर, आमदार संकल्प आमोणकर, कृष्णा उर्फ दाजी साळकर, उल्हास तुयेकर उपस्थित होते.

CM Pramod Sawant
Illegal Construction: हणजूणमधील 175 आस्थापने सील करा

निधी वापरण्यास सार्दिन असमर्थ

सार्दिन यांना खासदार निधी वापर करता येत नसल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. भाजपने गोव्यासाठी गत दहा वर्षांत ३० हजार कोटी रुपयांची विकासकामे केली. केवळ मोदी सत्तेत आहे म्हणूनच गोव्याचा सर्वांगीण विकास होत आहे.

साधनसुविधांमध्ये वाढ होत आहे. भाजपचे ध्येय नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती व गरीब कल्याण या चार खांबांवर आधारित आहे. जर मोदी सत्तेत नसते तर जुवारी पूल, अटल सेतू, मोपा विमानतळ यासारखे प्रकल्प झालेच नसते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

खासदार कोण हेच ठाऊक नाही कॉंग्रेसने केवळ जाती-धर्माचे राजकरण केले आणि करीत आहे. भाजपने केवळ देशाचा विकास व हित जपण्याचा निर्धार करूनच सरकार चालविले. कॉंग्रेसने केवळ हात दाखविला; परंतु हातांना काम देण्याचे काम भाजपचे सरकार करीत आहे. दक्षिण गोव्यातील काही मतदारसंघांत त्यांचा खासदार कोण हे लोकांना माहीत नाही. त्यांना केवळ नरेंद्र सावईकर खासदार होते, एवढेच माहीत आहे, असा टोलाही त्यांनी मारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com