Goa Crime News: मोर्लेत साडेचार वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून ठार मारण्याचा प्रयत्न!

Goa Crime News: अमानुष घटना : डोक्‍यावर घातला दगड; संशयितास अटक
Madhya Pradesh Crime
Madhya Pradesh CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: सत्तरी तालुक्‍यातील मोर्ले येथे अनन्या अनिल लमाणी या साडेचार वर्षांच्या बालिकेचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. या मुलीच्या घराशेजारीच राहणाऱ्या एका युवकाने काल सायंकाळी त्‍या मुलीचे आई-वडील नसताना तिच्‍या डोक्यात दगड घातला व त्यानंतर तिला गायब केले.

मात्र, ती मुलगी आज सकाळी पोलिसांना जखमी अवस्थेत जवळच्या डोंगरावर एका काजूच्या झाडाखाली आढळली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करून सदू ठाकूर (२८, मूळ मध्यप्रदेश) या युवकास अटक केली आहे.

मोर्लेतील चिरेखाणीवर काम करणारे परप्रांतीय मजूर राहत असलेल्या वस्तीतील एक चार वर्षाची मुलगी काल रात्रीपासून बेपत्ता होती. तिचे आईवडील मजुरी करून घरी आल्यानंतर त्यांना घरात त्यांची मुलगी दिसली नाही.

Madhya Pradesh Crime
Illegal Construction: हणजूणमधील 175 आस्थापने सील करा

त्यामुळे त्यांनी सगळीकडे शोधाशोध केली. शेवटी वाळपई पोलिस स्थानकात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या वस्तीतील लोकांची चौकशी केली.

मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यापैकी सदू ठाकूर याने तिला ठार मारल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर इतर चौघांना सोडून देण्यात आले.

काल रात्री 8 ते उत्तररात्री 3 वाजेपर्यंत पोलिसांनी मुलीचा शोध घेतला, पण तिचा थांगपत्ता लागला नाही. संशयित पोलिसांची दिशाभूल करत होता.

Madhya Pradesh Crime
गोव्यात हल्ला करुन फरार, बहराइचमध्ये सराफा व्यापाऱ्याला भोसकून लुटले; सराईतासह चौघांना अटक

पहाटे 3 वाजता पोलिसांनी शोधमोहीम थांबवली आणि संशयिताला पोलिसी खाक्‍या दाखविल्‍यानंतर त्याने तिच्‍या डोक्यात दगड घालून तिला ठार मारल्याचे सांगितले. संशयिताने हे कृत्‍य का केले, हे अजून स्‍पष्‍ट झालेले नाही. अधिक तपास सुरू आहे.

विव्हळत पडलेली मुलगी सापडली

पोलिसांनी संशयिताला घटनास्थळावर नेऊन बेपत्ता मुलीचा शोध घेतला असता, ती मुलगी डोंगरमाथ्यावरील एका काजूच्या झाडाखाली जखमी अवस्थेत विव्हळत पडल्याचे आढळून आले. लगेच तिला साखळी आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गोमेकॉत हलविण्‍यात आले. तिची प्रकृती गंभीर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com